Har Ghar Tiranga: घरपोच मिळणार राष्ट्रध्वज, फक्त 25 रुपयात करा ऑनलाईन ऑर्डर
हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हाला राष्ट्रध्वज आता घरपोच मिळणार आहे.
Har Ghar Tiranga : भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जुलै रोजी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली. त्यांनी 13 ऑगस्टे ते 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा यासाठी पोस्टातून तो खरेदी करता येणार आहे. पोस्ट ऑफीसमध्ये जावून रहिवाशांना प्रति ध्वज रु.25 मध्ये मिळणार आहे. आपण हर घर तिरंगा अभियानात कसे सामील होऊ शकता आणि 25 रुपयांमध्ये राष्ट्रध्वज आपल्या घरी कसा पोहोचू शकतो. जाणून घ्या.
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याचं आवाहन करण्या मागचा अभियानाचा उद्देश लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढवणे आहे. भारतीय राष्ट्रध्वज मिळविण्यासाठी स्थानिकांना सरकारी टपाल यंत्रणा फक्त 25 रुपयांमध्ये भारतीय ध्वज वितरण करत आहे.
राष्ट्रध्वज कसा कराल ऑर्डर
1. ई-पोस्टऑफिस (https://www.epostoffice.gov.in/) पोर्टलला भेट द्या आणि नवीन युजर म्हणून नोंदणी करा.
2. लॉगिन केल्यानंतर राष्ट्रीय ध्वजचा फोटो दिसेल त्यावर क्लिक करा.
3. Buy now वर क्लिक करुन पेमेंट करा.
25 रुपयांशिवाय यावर कोणतेही शिपिंग शुल्क आकारले जाणार नाही. भारतीय ध्वजाचा आकार 20 इंच बाय 30 इंच आहे. तिरंग्याची किंमत 25 रुपये प्रति नग आहे. भारतीय ध्वजावर जीएसटी नाही. ग्राहकांना त्यांची ऑर्डर रद्द करता येणार नाही.