रामराजे शिंदे, नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांचं आंदोलन दडपण्यासाठीच अण्णांनी आंदोलन केल्याचा दावाही हार्दिक पटेलांनी केला आहे. आपण मोदीविरोधक असल्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून अण्णांनी आपल्याला व्यासपीठावर येऊ देण्यास मनाई केल्याचा आरोपही हार्दिक पटेलांनी केलाय. तर अण्णांचे निकटवर्तीय विनायक पाटील यांनी हार्दिक पटेलांचे आरोप फेटाळून लावले आहेत.


पाटीदार नेता हार्दिक पटेल याने अण्णा हजारे यांच्यावर भाजपसोबत सेटींग केल्याचा आरोप केला आहे. भेट ठरलेली असतानाही अण्णांच्या आंदोलनांकडे हार्दिक पटेल यांनी पाठ केली. 


हार्दिक पटेल यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे 


1)  अण्णांचे आंदोलन भाजप सोबत सेटींग आहे


2)  आंदोलन झाल्याचे दाखवून सरकार काही दिवसात चर्चा करेल


3)  इतर शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी अण्णांचे आंदोलन आहे


4)  केंद्र सरकार मला (हार्दिक पटेल) घाबरत आहे. 


5)  अण्णांच्या आंदोलनात मला जाऊ दिले नाही, मी मोदी विरोधी असल्यामुळे मला व्यासपीठावर घेऊ नका म्हणून भाजपने अण्णांना सांगितले


6) अण्णांवर भाजपचा दबाव आहे.  मी गेलो तर सरकार वेगळा निर्णय घेईल अशी भिती आहे


7)  अण्णा हजारे यांनी व्यासपीठावर जाण्यास अटी ठेवल्या आहेत. अटी असतील तर आंदोलनाला पाठींबा कोणी देणार नाही


8) आंदोलनात शेतकरी आले नाहीत.  हे कशामुळे होतेय अण्णांनी विचार करायला हवा