अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं त्यांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये पाटीदार अनामत आंदोलन समिती म्हणजेच हार्दिक पटेलच्या गटाला फक्त दोनच तिकीटं देण्यात आली.  २० तिकीटांची मागणी केल्यावरही दोनच तिकीटं मिळाल्यामुळे हार्दिक पटेलची संघटना नाराज झाली आणि संतप्त पाटीदार कार्यकर्त्यांनी काँग्रेसची अहमदाबाद आणि सुरत मधील कार्यालयं फोडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या राड्यानंतर हार्दिक पटेलनं नरमाईची भूमिका घेतली आहे. ‘बाधाएं आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं,निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा.’अशी कविता हार्दिक पटेलनं ट्विटरवरून शेअर केली आहे.  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ही कविता आहे.



 


काँग्रेसनं गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी ७७ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये हार्दिक पटेलच्या संघटनेतल्या दोघांना उमेदवारी देण्यात आली. ललित वसोया आणि अमित ठुम्मर अशी त्यांची नावं आहेत. कमी जागा दिल्यामुळे नाराज झालेल्या पाटीदार नेत्यांनी दोन्ही उमेदवारांना अर्ज न भरण्याचे आदेश दिले होते, पण ललित वसोया यांनी काँग्रेसच्या तिकीटावर धारोजी सीटवर अर्ज दाखल केला आहे. 


काँग्रेस-पाटीदार कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा