मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी ट्विटरवर शेअर केलेली एक पोस्ट शेअर सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने पाठवलेल्या पत्रावर हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर उत्तर दिलं आहे. 


कर्मचाऱ्याच्या पत्नीचं पत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक पत्नी आपल्या पतीबद्दल तक्रार करत आहे, वर्क फ्रॉम होम बंद करुन कार्यालयातून काम सुरू करावं असं आव्हान तीने पत्राद्वारे केलं आहे. या पत्रात तिने म्हटलं आहे.


डिअर सर, मी तुमचा कर्मचारी मनोजची पत्नी आहे. त्यांना आता कार्यालयातून काम करण्याची परवानगी द्यावी असं नम्र आवाहन आहे. माझ्या पतीला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि ते कार्यालयातील सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करतील. त्यांचं वर्क फ्रॉम होम आणखी काही काळ सुरु राहिलं तर आमचं लग्न पुढे चालणार नाही. तो दिवसातून दहा वेळा कॉफी पितो, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसतो आणि तिथे घाण पसरवतो. सतत जेवायला मागतो. मी त्याला कामादरम्यान झोपलेल देखील पाहिलं आहे. मला आधीच दोन मुलांची काळजी घ्यायची आहे. माझा विवेक परत मिळवण्यासाठी मला तुमचा पाठिंबा  हवा आहे.


उद्योगपती हर्ष गोएंका यांचं उत्तर


या पत्राला उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे. 'मला कळत नाही यावर कसं उत्तर देऊ...', हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर काही लोकांनी कर्मचाऱ्याच्या पत्नीची बाजू घेतली आहे तर काही लोकांनी वर्क फ्रॉम होम सुरुच ठेवावं असं म्हटलं आहे.



पोस्टवर लोकांच्या तुफान प्रतिक्रिया


उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ट्विट शेअर केल्यानंतर या पोस्टला आतापर्यंत 4,000 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. एवढंच नाही तर चाहत्यांनी या पोस्टवर अनेक कमेंट्सही केल्या. हर्ष गोएंका यांनी नेटिझन्सच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. एका युझर्सने लिहिलं, 'पुरे झालं, त्याला कामावर परत बोला.' दुसर्‍या युझर्सने म्हटलं आहे, 'तुम्ही ती व्यक्ती असता तर तुम्ही काय कराल ते आम्हाला सांगा?' 


हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या पोस्टवर तुमचं काय मत आहे?