हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान, निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे काय?
Haryana Vidhansabha Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत. 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणाराय.. या निवडणुकीत महत्वाचे मुद्दे कोणते आहेत... निवडणुकीचं काय वातावरण आहे? या सगळ्याचा झी 24 तासच्या टीमने हरियाणामध्ये जाऊन आढावा घेतला.
उर्वशी खोणा, झी मीडिया, हरयाणा : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Haryana Vidhansabha Election 2024) 5 ऑक्टोबरला मतदान (Voting) होणार आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय.. हरियाणामध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) थेट लढत होणाराय.. या निवडणुकीत कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर एक नजर टाकुयात..
हरियाणा निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे
- शेतकरी आंदोलन आणि हमी भाव
- अग्निवीर योजना - बेरोजगारी आणि रोजगार निर्मिती
- कुस्तीपटूंचे आरोप
- सत्ताधारी विरोधी लाट
या महत्त्वाच्या मुद्द्यांसोबतच हरियाणा विधानसभेच्या निवडणूकीत जातीय समीकरणंही महत्वाची मानली जाताहेत..जाट, गुज्जर, ब्राम्हण, राजपूत, सैनी, अहिर, रोहोर आणि ओबीसी समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस पक्षांची चढाओढ पाहायला मिळाली..
भाजप आणि काँग्रेसने तिकीट वाटप कसं केलंय. त्यावर एक नजर टाकुया..
जातीय समीकरणं
- काँग्रेसकडून 28 जागांवर जाट तर 20 जागावर ओबीसी उमेदवार
- भाजपकडून 16 जागांवर जाट तर 22 जागांवर ओबीसी उमेदवार
हरियणाचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळं कनेक्शनही आहे, ते म्हणजे रोड मराठा. पानिपत, सोनिपत, करनाल, कैथल, रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड मराठा समाज वसलेला आहे. रोड मराठ्यांची निश्चित अशी लोकसंख्या माहिती नसली तरी रोड मराठ्यांची लोकसंख्या हरियाणामध्ये अंदाजे 7 ते 8 लाखांवर आहे.
हरियाणामध्ये 2019 च्या विधानसभेत भाजपने बाजी मारली होती. 2019 मध्ये काय चित्र होतं त्यावर एक नजर टाकुया.
2019 मधील आकडेवारी
भाजप - 40 काँग्रेस- 31 जेजेपी- 10 अपक्ष - 7 आता यंदाच्या निवडणुकीत हरियाणाच्या आखाड्यात कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..