मुली OYO रूममध्ये हनुमानाच्या आरतीला जात नाहीत... महिला आयोगाच्या अध्यक्षांचे वक्तव्य चर्चेत
Renu Bhatia: जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी कॉलेजमध्ये येतात तेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याची भावना येते. तुम्ही काही घालता, कुठेही जाता. तर मुलांना वाटतं की आता गर्लफेन्ड मिळवण्याची वेळ आली आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया म्हणाल्या.
Renu Bhatia Controversial Statement: हरियाणाच्या महिला आयोगाच्या (Haryana Women Commission) अध्यक्षा रेणू भाटिया (renu bhatia) या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रेणू भाटिया यांनी मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुलींसोबत होणाऱ्या शारीरिक अत्याचाराच्या (physical abuse) वाढत्या घटनांबाबत रेणू भाटिया यांनी यासाठी मुलींनाचा जबाबदार धरले आहे. सायबर गुन्ह्यांबाबतच्या जागरुकता कार्यक्रमात बोलताना रेणू भाटिया यांनी हे वक्तव्य केले आहे. मुली ओयो (OYO) रुममध्ये का जातात? हनुमानाटी आरती करण्यासाठी तर नाही ना, असे रेणू शर्मा यांनी म्हटलं आहे.
हरियाणातील कैथल जिल्ह्यातील आरकेएसडी कॉलेजमध्ये कायद्याबाबत आणि सायबर गुन्ह्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया या प्रमुख पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिलांना सायबर गुन्हेगारी आणि महिलांच्या छेडछाड प्रकरणांबाबत जागरूक केले. यावेळी बोलताना त्यांनी अशा ठिकाणी जाताना तुमच्यासोबत वाईटही घडू शकते, हेही ध्यानात ठेवले पाहिजे, असे म्हटले आहे.
"आतापर्यंत आमच्या निदर्शनास आलेल्या मुलींची बहुतांश प्रकरणे लिव्ह-इन-रिलेशनशीपशी संबंधित आहेत. आम्ही या प्रकरणांमध्ये दोष देत नाही तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. मुलींनी अशा बाबतीत समजून घ्यायला हवे. कारण ती ओयोला गेली तर ती हनुमानाची आरती करायला जाणार नाही. अशा ठिकाणी जाताना हे लक्षात ठेवले पाहिजे की तिथे तुमच्यासोबत वाईट प्रसंग येऊ शकतो. लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यामुळे जिथे जिथे ही प्रकरणे समोर आली आहेत तिथे कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे दोन्ही कुटुंबे तुटली आहेत, त्यामुळे या कायद्यात बदल करण्याची गरज आहे," असे रेणू भाटिया म्हणाल्या.
"अनेकदा मुली तक्रार नोंदवताना सांगतात की त्याच्यासोबत मैत्री झाली, त्याने मला कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी पाजले आणि माझ्यासोबत वाईट कृत्य केले आणि माझा व्हिडिओ बनवला. ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. यामध्ये मुलींना हेही माहीत नाही का की, जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो तेव्हा तिथे आपण हनुमानाची आरती तर करणार नाही. जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो तेव्हा आपल्या मैत्रीत काहीतरी गडबड असेल असा विचार करायला हवा," असेही रेणू भाटिया म्हणाल्या.