नवी दिल्ली: भाजप नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची वादग्रस्त विधाने लोकांसाठी नवी नाहीत. ही विधाने करताना ते अनेकदा घसरतात. पण, या वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करतना विज यांची जिभ जरा अधिकच घसरली आहे. अनिल विज यांनी राहुल गांधी यांना थेट निपा व्हायरसची उपमा दिली आहे. राहुल गांधी हे निपा व्हायरसप्रमाणे असून जो त्यांच्या संपर्कात येतो तो संपुष्टात येतो, असे विज यांनी म्हटले आहे. विजय यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते जोरदार चर्चेत आले असून, सोशल मीडियावरही ते टीकेचे धनी झाले आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून मात्र विज यांच्या विधानावर अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विज यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींवर टीका केली आहे. निपा व्हायरसची राहुल गांधींना उपमा देणारे हे ट्विट विज यांनी दोन दिवसांपूर्वी केले आहे. मात्र, गेल्या काही तासांत ते ट्विट जोरदार व्हायरल झाले. विज यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याला कर्नाटक विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. गेल्याच आठवड्यात कर्नाटकमध्ये काँग्रेसने जेडीएसच्या सहकार्याने सरकार स्थापन केले. त्यावरून विज यांनी ही टीका केली आहे. दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सध्या विदेशात आहेत.



काय आहे निपा व्हायरस


दरम्यान, निपा व्हायरस हा एक प्रकारचा संक्रमीत आजार आहे. जो प्राणी, पशू-पक्षांनी झाडावर खाल्लेली फळे, फळे यांच्यात आणि त्यानंतर माणसांत संक्रमीत होतो. या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तिचा मृत्यू होऊ शकतो. आतापर्यंत या व्हायरसने काही लोकांचा बळी घेतला आहे. चिंताजनक असे की, आतापर्यंत या रोगावर नियंत्रण मिळवणारी कोणतीही लस उपलब्ध होऊ शकली नाही.