मुंबई : Haryana Latest Crime News: चार जणांनी दोन बहिणींवर बलात्कार केल्याची घटना हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर दोन्ही बहिणींना विष देऊन ठार करण्यात आले. दोन्ही बहिणींचे वय 14 आणि 16 वर्षे होते. दोघांना उपचारासाठी दिल्लीला नेण्यात आले, तिथे दोघांचाही मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी त्यांच्या घरात घुसून अत्याचार केला. त्यानंतर विष दिल्यामुळे या दोन्ही मुलींची प्रकृती बिघडली. त्यावेळी अत्याचार करणारे चौघे मुलींना सापाने दंश केल्याचे सांगून ते पळून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणातील कुंडली पोलीस स्टेशनचे प्रभारी रवी कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्थलांतरित मजूर आहेत. जे या मुलींच्या घराजवळ भाड्याच्या घरात राहत होते. ते 22 ते 25 वर्षांचे आहेत. दोन्ही मुली अनुक्रमे 14 आणि 16 वर्षांच्या होत्या आणि त्या त्यांच्या आईसोबत राहत होत्या. त्यांची आई मजुरीचे काम करत होती.


5 आणि 6 ऑगस्टच्या मध्यरात्री आरोपींनी जबरदस्तीने या मुलींच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या आईला धमकावले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चौघांनी दोन बहिणींवर कथितपणे बलात्कार केला आणि नंतर त्यांना कीटकनाशक पिण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघींची प्रकृती बिघडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलींची प्रकृती खालावू लागली, तेव्हा आरोपींनी त्यांच्या आईला पोलिसांना सांगण्यास सांगितले की, त्यांच्या मुलींना सापाने चावा घेतला आहे. कुमार म्हणाले की, दोन्ही मुलींना दिल्लीतील रुग्णालयात नेण्यात आले जेथे एका बहिणीला डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि दुसऱ्या बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांनी दहशत आणि भीतीपोटी सांगितले की, दोन्ही मुलींना साप चावला आहे. मात्र, यात काहीतरी गडबड आहे, अशी आम्हाला शंका होती आणि जेव्हा आम्ही त्या महिलेची कसून चौकशी केली, तेव्हा तिने खरी गोष्ट सांगितली. ते म्हणाले की पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार आणि विषबाधा झाल्याची पुष्टी झाली आहे, असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.