लखनऊ : हाथरसमधील पीडितेवर बलात्कार (Hathras gangrape) झालाच नाही, असा अजब आणि संतापजनक दावा पोलिसांनी केला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टचा आधार घेत पोलिसांनी हा अजब दावा केला आहे. त्यामुळे देशात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गळ्याजवळ झालेली दुखापत आणि त्यामुळे झालेल्या मानसिक आघातामुळे हाथरसच्या पीडितेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. तसेच तपासणी केलेल्या नमुन्यांमध्ये शुक्राणू आढळले नसल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार झाला नाही, असा पोलिसांचा दावा आहे. 



उत्तर प्रदेशात हाथरस (Hathras gangrape) इथे अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी तिच्या मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार  (Hathras gang rape Victim) करायला लावल्याचा आरोप या मुलीच्या पालकांनी केला आहे. मात्र या मुलीवर तिच्या नातेवाईकांच्या संमतीनेच अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आता पोलिसांनी अजब दाबा केला आहे. या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी शवविच्छेदनाचा आधार घेतला आहे.


पीडित तरुणीच्या कुटुंबीयांचा साधा एफआयआर नोंदवून न घेणाऱ्या पोलिसांनी मध्यरात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे संशय व्यक्त होत आहे. दिल्लीतील रुग्णालयातून मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतला होता. विशेष म्हणजे नातेवाईकांच्या आधी पोलीस मृतदेह घेऊन गावात पोहोचले. त्यानंतर रात्री अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 


हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला आहे. तसेच सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॉस्पिटल बाहेर आंदोलन केले. नंतर कँडल मार्च काढण्यात आला. युपीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसकडून याविरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.