तुमचा PF कापला जातो आणि तुम्ही एकापेक्षा जास्त नोकऱ्या बदलल्या आहेत? मग हे काम नक्की करा
अनेकदा लोकं त्यांच्या नोकऱ्या बदलतात परंतु त्यांना हे माहित नसते की, त्यांच्या पीएफ अकाउंटबद्दल त्यांनी काय करायला हवं?
मुंबई : जर तुमच्याकडे पीएफ खाते असेल आणि तुम्ही एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळा नोकऱ्या बदलल्या असतील, तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. जर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुम्ही आतापर्यंत एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये काम केले असेल आणि तुमचा पीएफ कापला गेला असेल तर तुम्हाला एक गोष्ट करणे आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला पैसे काढणे खूप कठीण होऊन बसेल.
कारण अनेकदा लोकं त्यांच्या नोकऱ्या बदलतात परंतु त्यांना हे माहित नसते की, त्यांच्या पीएफ अकाउंटबद्दल त्यांनी काय करायला हवं, ज्यामुळे लोकांच अनेकदा नुकसान होते. त्यामुळे अशा लोकांनी त्यांची नोकरी बदलताना त्यांचे पीएफ खाते मर्ज करण्याची आवशकता असते. त्याचप्रमाणे याचे नियम काय आहेत आणि तुम्ही काय केले पाहिजे ते जाणून घ्या.
काय आहेत नियम?
जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करता, तेव्हा एका यूएएनमध्येही तुमची अनेक खाती निर्माण होतात, जी प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळी असतात. जर तुमच्या बाबतीतही असे झालं असेल, तर तुम्हाला तुमचे जुने खाते आता नवीन खात्यांत ट्रांसफर करणे किंवा मर्ज करण्याची आवश्यकता आहे.
असे केल्यानंतरच तुम्ही तुमच्या हक्काचे संपूर्ण पैसे काढण्यात सक्षम असू शकता. जेव्हा अकाउंट मर्ज कराल तेव्हा तुम्ही एकाच वेळी सर्व खात्यातून पैसे काढू शकता. ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तुमच्या खात्यासंबंधीत संपूर्ण माहिती पाहू शकता. यामध्ये तुमची एकूण किती खाती आहेत, ज्यांना विलीन करणे आवश्यक आहे हे तुम्हाला कळेल.
खाती कशी मर्ज करायची?
सर्व खात्यांमधून एका खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सर्व खात्यांमध्ये एक्झिट डेट अपडेट करावी लागेल, जेणेकरून EPFO ला कळेल की, तुम्ही नोकरी सोडली आहे. तुम्ही ईपीएफओ वेबसाईटमध्ये Manage पर्यायावर जा आणि Mark Exit च्या पर्यायावर जा आणि सध्याची कंपनी वगळता सर्व कंपन्यांमधून Exit करा. यासाठी तुम्हाला त्या त्या कंपन्यांमधून बाहेर पडण्याची तारीख तेथे टाकावी लागेल.
यानंतर, होम पेजवरील Online Services पर्यायावर जाऊन, One Member- One EPF Account (Transfer Request) वर क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तपशील दिसेल. यानंतर टप्प्याटप्प्याने प्रक्रिया होईल, जी तुम्हाला दिसेल.
यामध्ये, तुम्हाला वर्तमान किंवा मागील नियोक्ताकडून मंजुरी मागितली जाईल आणि तुमच्या मते, तुम्हाला कोणाकडून मंजुरी मिळवायची आहे ते निवडा.
यामध्ये तुम्ही तुमचे तपशील भरा आणि त्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल आणि ओटीपीद्वारे पैसे सहज ट्रांसफर केले जातील. तसेच, त्यामध्ये याची पुष्टी करण्यासाठी दोन पर्याय विचारले जातील की, आपल्याला जुन्या कंपनीकडून किंवा नवीन कंपनीकडून याची माहिती मिळेल.
अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या सध्याच्या कंपनीसमोर टीक करा जेणेकरून तुम्ही सध्याच्या कंपनीशी सहजपणे याबद्दल बोलू शकाल. कारण कंपनीच्या मंजुरीनंतरच तुमच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील.