HDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदा
Bank Intrest Rate: तुम्हीदेखील HDFC आणि Axis बँकेचे ग्राहक असाल तर या बदललेल्या नियमांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवे.
Bank Intrest Rate: आपल्या आयुष्याची जमापुंजी सुरक्षित जागी ठेवण्यासाठी प्रत्येकाचे बॅंकेत सेव्हिंग, एफडी अकाऊंट असते. अनेक बॅंका आपल्या ग्राहकांसाठी निर्बंध लादतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सेव्हिंग्सवर कमी व्याज मिळते. असे असताना एचडीएफसी ॲक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे दोन्ही बॅंकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेसह देशातील चार मोठ्या बँकांनी 1 जुलैपासून आपल्या नियमात महत्वाचे बदल केले आहेत. ग्राहकांना फायदा व्हावा, या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना त्यांनी बॅंकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीदेखील HDFC आणि Axis बँकेचे ग्राहक असाल तर या बदललेल्या नियमांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवे.
एका वर्षाच्या मुदत ठेवीवर किती व्याज?
बॅंकामध्ये तुमच्या एफडीवर सर्वसाधारणपणे 6 टक्के इतके व्याज मिळते. पण बॅंकेने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्याजदरात वाढ केल्याची घोषणा केली आहे. HDFC बँकेमध्ये एका वर्षाच्या एफडीवर 6.60 टक्के व्याज दिले जात आहे. तर ॲक्सिस बँकेत तुम्ही फक्त एका वर्षासाठी एफडी केली तरी तुम्हाला 6.70 टक्के व्याज मिळू शकते. या दोनच बॅंका नव्हे तर व्याज देण्याच्या बाबतीत इतर बॅंकाही स्पर्धेत उतरल्या आहेत. ICICI बॅंकेतील एफडीव 6.70 टक्के आणि SBI एका वर्षाच्या एफडीवर 6.8 टक्के व्याज मिळते.
2 वर्षांच्या एफडीवर किती व्याज?
एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 2 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे. तर अॅक्सिस बॅंक आपल्या ग्राहकांना 2 वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणुकीवर 7.10 टक्के व्याज देत आहे. इतर बँकाही या स्पर्धेत असून आयसीआयसीआय आणि एसबीआय एका वर्षाच्या एफडीवर 7.20 टक्के आणि 7 टक्के व्याज देत आहेत. त्यामुळे या बॅंकामध्ये तुमचे अकाऊंट असेल तर एफडी करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.
3 वर्षांच्या मुदत ठेवीवर किती व्याज?
एचडीएफसी बँक तीन वर्षांच्या एफडीचे व्याजदरही जाहीर केले आहेत. त्यानुसार एचडीएफसी तुम्हाला 3 वर्षाच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे. तर अॅक्सिस बॅंक आपल्या ग्राहकांना त्यांच्या एफडीवर 3 वर्षांसाठी 7.10 टक्के व्याज देतेय. ICICI आणि SBI एका वर्षाच्या FD वर अनुक्रमे 7 टक्के आणि 6.75 टक्के व्याज देत आहेत.
बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँकेनेही आपल्या ग्राहकांना खुश ठेवण्यात कोणतही कसर ठेवत नव्हता. बँक ऑफ इंडियाने 30 जून 2024 पासून एफडीवरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. बँक ऑफ इंडियाची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर आहे. बीओआय सिनिअर सिटिझन्सना 666 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 7.80% व्याज देत आहे. तर इतर ग्राहकांना त्यांच्या एफडीवर समान दिवसांसाठी 7.3% पर्यंत मिळते. हे बॅंकेचा सर्वाधिक व्याजदर आहे.
व्याजदर बदल
1 जुलै 2024 अनेक बॅंकानी आपल्या व्याजदरात बदल केलाय. त्यात पंजाब अँड सिंध बँकेनेदेखील एफडीवरील नवे व्याजदर बदल जाहीर केले आहेत. पंजाब अँड सिंध बँकने ज्येष्ठ नागरिकांसाठी 666 दिवसांच्या एफडीवर 7.80% व्याज देण्याचा निर्णय घेतलाय. तर इतर व्यक्तींसाठी त्याच कालावधीसाठी एफडीवर जास्तीत जास्त 7.3% पर्यंत व्याज देण्याचा निर्णय घेतलाय.