एचडीएफसी बॅंकेने बचत खात्यातील व्याजदरात केले हे बदल !
एचडीएफसी बॅंकेने बचत खात्यावर मिळणार्या व्याज दरात ०.५० टक्के कपात केली आहे.
मुंबई : एचडीएफसी बॅंकेने बचत खात्यावर मिळणार्या व्याज दरात ०.५० टक्के कपात केली आहे.
आता एचडीएफसी ३.५ % दर देणार आहे. तर ५० लाख व त्याहून अधिक रक्कम जमा असलेल्या खातेदारांना ४% व्याज दिले जाईल.
सामान्य बचत खातेदारांना ३.५ % तर ५० लाखाहून अधिक रक्कम असणार्या खातेदारांना ४% व्याज येत्या १९ ऑगस्टपासून लागू करण्यात येतील.
एचडीएफसी प्रमाणेच अॅक्सिस आणि बॅंक ऑफ़ बडोदा या बॅकांनीही त्यांच्या व्याजदरात कपात केली आहे. सुरवातीला एसबीआय बॅंकेने एक करोड किंवा त्याहून कमी रक्कम जमा असलेल्या खातेदारांना ३.५ % व्याजदर देण्यास सुरवात केली.
त्यापाठोपाठ अॅक्सिस आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनीही बचत खात्याच्या व्याज दरात कपात केली.