HDFC BANK FD RATES HIKE: सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये व्याजदरात वाढ झाली आहे. अमेरिकेतील फेडरल बॅंकेनंही (Federal Bank) व्याजदरात मोठी वाढ केली आहे. त्यातून भारतीय रिझर्व्ह बॅंकेनंही व्याजदारात वारंवार वाढ केली आहे. याच महिन्यात शक्तिकांत दास (RBI Shaktikant Das) यांनी व्याजदरात मोठी वाढ केल्याचे पाहायला मिळाले असून हा व्याजदर 0.25 पॉईंट्सनं वाढला आहे. त्यामुळे भारतातील महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वारंवार वाढ केली आहे. त्याचा फटाका आता सर्वसामान्यांना त्यांच्या EMI वर पाहायला मिळणार आहे. त्यांना जास्तीचा इएमआय आता भरावा लागणार आहे. त्यातून आता चांगली बाब म्हणजे बॅंकांनी आपले एफडीवरील व्याजही वाढविले आहे. त्यातील मोठमोठ्या बॅंकांनी आपल्या करावरील व्याज वाढविले आहे. त्यातीलच एक बॅंक म्हणजे HDFC BANK. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडीएफसी बॅंकनंही आपल्या बचत ठेवीच्या व्याजदरावर वाढ केली आहे. यामध्ये 7 दिवस आणि 10 वर्षांच्या कार्यकाळातील बचत ठेवींवरील ही व्याजदार वाढ आहे. सर्वसामान्यांसाठी 3 टक्क्यांपासून 7.10 टक्क्यांपर्यंत आणि 3.50 टक्क्यांपासून 7.60 टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढ केली आहे. त्यातून ही सेवा सुरू झाली असून ज्येष्ठ नागरिकांसाठी (FD for Senior Citizens) 21 फेब्रुवारीपासून लागू होईल. 


जाणून घेऊया काय आहे नवीन व्याज दर : 


7 - 14 दिवसांसाठी 3.00%, 15 - 29 दिवसांसाठी 3.00%, 30 - 45 दिवसांसाठी  3.50%, 46 - 60 दिवसांसाठी 4.50%, 61 - 89 दिवसांसाठी 4.50%, 90 दिवसांसाठी <= 6 महिन्यांसाठी 4.50%, 6 महिन्यांसाठी 1 दिवसांसाठी <= 9 महिने 5.75%, 9 महिन्यांसाठी 1 दिवसांसाठी ते < 1 वर्षासाठी 6.00%, 1 वर्षासाठी ते <15 महिन्यांसाठी 6.60%, 15 महिन्यांसाठी ते <18 महिन्यांसाठी 7.10%, 18 महिन्यांसाठी ते <21 महिन्यांसाठी 7.00%, 21 महिन्यांसाठी ते 2 वर्षांसाठी 7.00%, 2 वर्षे 1 दिवसासाठी ते 3 वर्षांसाठी 7.00%, 1 दिवसांपासून 3 वर्षांसाठी ते 5 वर्षांसाठी 7.00%, 5 वर्षे 1 दिवसांसाठी ते 10 वर्षे 7.00% 


फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आरबीआयने रेपो दरात (Repo Rates) वाढ केली होती त्याचा परिणाम म्हणून बॅंकानी मोठ्या प्रमाणात व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता बॅंकांनी आपल्या बचत ठेवींवरील व्याजही मोठ्या प्रमाणावर वाढविले. ज्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. जवळपास सर्व बँका त्यांच्या ठेवी आणि कर्जदरात वाढ करत आहेत. यामध्ये सर्व बँकांचा समावेश असून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करत आहेत.