HDFC Bank UPI Update: देशातील अनेक विश्वासार्ह आणि बड्या खासगी बँकांपैकी एक असणारं नाव म्हणजे एचडीएफसी बँक. कैक नोकदरारांच्या पगाराच्या खात्यांपासून या बँकेत अनेक सामान्य नागरिकांचेही Saving Accounts आहेत. अशा या एचडीएफसी बँकेकडून ग्राहकांसाठी नुकतीच एक सूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये बँकेच्या एका निर्णयामुळं लाखो खातेधारकांवर परिणाम होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडीएफसी बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार (HDFC Bank) 13 जुलै रोजी खातेधारकांना UPI सोबत इतरही काही सेवांचा वापर करता येणार नाहीय. ज्यामुळं या दिवशी पैशांची देवाणघेवाण करताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. थोडक्यात काही आर्थिक कामं असल्यास ती 13 जुलैआधीच उरकून घेण्याचं आवाहन खातेधारकांना करण्यात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : 'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...


बँकेकडून वेळोवेळी सिस्टीम अपग्रेडतं काम हाती घेतलं जात असून, आता पुन्हा एकदा याच कामासाठी बँकेची युपीआय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यानच्या वेळेत ग्राहकांना त्यांचा Bank Balance सुद्धा पाहता येणार नाहीय. ज्यामुळं एचडीएफसी खातेधारकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, अशीच चिन्हं दिसत आहेत. 


बँकेकडून होणाऱ्या कार्यवाहीमध्ये  सुसूत्रता आणण्यासाठी आणि कार्यक्षमता आणखी प्रभावी करण्यासाठी म्हणून एचडीएफसी बँकेकडून हे सिस्टीम अपग्रेडचं काम हाती घेण्यात येणार आहे. 13 जुलै रोजी सकाळी 3 वाजल्यापासून 4.30 वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार असून, ग्राहकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो यासाठी बँकेकडून ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत. 


बँकेचं सिस्टीम अपग्रेड सुरु असताना फक्त युपीआयच नव्हे, तर IMPS, NEFT, RTGS अशा सर्व पद्धतीचे व्यवहार बंद राहतील याची खातेधारकांनी नोंद घ्यावी. दरम्यान, ग्राहकांसाठी बँकेनं पर्यायी व्यवस्था तयार ठेवली असून, ज्यावेळी ऑनलाईन बँकिंग बंद राहिल तेव्हा खातेधारक क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून आर्थिक गरजा भागवू शकणार आहेत.