मुंबई : सोन्याचे दागिने परिधान करणं तुम्हालाही आवडतं का? आवडत असेल तर त्याचा तुमच्या आरोग्यालाही कसा फायदा होतो, हेही तुम्हाला माहीत असायला हवं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याचे दागिने हे केवळ फॅशन नसून तुमच्या आरोग्यासाठी अतिशय दाभदायक ठरतात. त्यामुळेच, प्राचीन काळापासून महिला-पुरुष सोन्याचा वापर दागिन्यांच्या रुपात करत आलेत. डिप्रेशन कमी करण्यापासून ते 'रुमेटॉयड अर्थरायटिस'ग्रस्त रुग्णांसाठी सोन्याचा वापर उपचार ठरतो. 


- जुन्या काळाच्या मान्यतेनुसार, एखाद्या जखमेवर २४ कॅरेटचं सोनं ठेवलं तर ती जखम भरून काढण्यात आणि संक्रमण रोखण्यात मदत होते. 


- तुमच्या मनाला शांती देण्याचं आणि तुम्हाला रिलॅक्स करण्याचं कामही सोनं करतं. मानसिक आणि भावनात्मक शांतीसाठी सोन्याचे दागिने परिधान केले जातात. सोन्याला इतर धातुंसोबत ठेवल्यानं मात्र याचा प्रभाव कमी होतो. 


- सोन्याचे दागिने परिधान केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य राहते. शरिरातील प्रत्येक भागात ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठीही सोनं महत्त्वाचं ठरतं. 


- सोन्यामुळे शरीराचं तपमानही नियंत्रणात राहतं. बाहेरचं तपमान बदलल्यानंतरही आपल्याला आजारांपासून वाचवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सोनं फायदेशीर ठरतं. 


- सोन्याचे दागिने परिधान केल्यामुळे शरीराला कोणताही अपाय होत नाही. सोन्याचे कोणतेही साईड इफेक्टस नाहीत


- सोनं महाग असलं तरीही ते विकत घेण्यास लोक मागे-पुढे राहत नाहीत. जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल किंवा नकारात्मक प्रभावाखाली असाल तेव्हा सोनं परिधान केल्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळू शकते, असंही म्हटलं जातं.