Health Insurance Rules Change : आरोग्यावर होणारा खर्च काही कधी पण आणि मोठ्या प्रमाणात असतो. अनेक आजारांसाठी लाखोच्या घरात पैसे मोजावे लागतात. अशा परिस्थिती विमा कंपनींकडून आपण आरोग्य विमा घेतो. आरोग्य विमा कंपनीचे जाळे पसरले असून या कंपन्यांच्या मनमानीमुळे होणाऱ्या त्रास देतात. आता आरोग्य विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे होणाऱ्या त्रासातून रुग्णांची दिलासा मिळणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDAI ने नवीन नियम जाहीर केले आहेत. या नव्या नियमानुसार आता अवघ्या 3 तासात Health Insurance Claim क्लिअर न झाल्यास कंपनीला याचा फटका बसणार आहे. IRDAI यांच्यानुसार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ही प्रक्रिया 24 तासात पूर्ण करणे विमा कंपनींना बंधनकारक असणार आहे. विमा दावा प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी IRDAI हे पाऊल उचले असून त्यांनी नवी नियमाचे परिपत्रक जारी केलंय. 


काय आहेत नवीन नियम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन परिपत्रक लागू झाल्यानंतर आता कोणत्याही रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवण्यासाठी विमा क्लिअरची वाट पाहावी लागणा नाही. तर विमा कंपनीला Health Insurance Claim क्लिअर करावा लागेल आणि 3 तासांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 


जर रुग्णाच्या विमा दाव्यावर 24 तासांच्या आत प्रक्रिया झाली नाही, तर विमा कंपनीला त्याच्या हॉस्पिटलमध्ये राहण्याचा सर्व अतिरिक्त खर्च द्यावा लागणार आहे. IRDAI चा हा नियम म्हणजे कंपनीवर ठोठावला जाणारा मोठा दंड आहे. उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास, विमा कंपनीला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या दाव्यावर त्वरित प्रक्रिया करावी लागेल. म्हणजे त्या कुटुंबाला मृतदेह लवकरात लवकर रुग्णालयातून घरी नेता येईल. 


IRDAI ने आरोग्य विमा कंपन्यांना त्यांचे कॅशलेस क्लेम सेटलमेंट रेशो 100% पर्यंत वाढवण्याचे आदेश दिलेय. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत कंपनीला ही प्रक्रिया पूर्ण करून 24 तासात अधिकृतता देणं बंधनकारक आहे. 


नवीन नियम कधीपासून लागू होणार?


IRDAI चे नवीन परिपत्रक 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. विमा नियामकाने विमा कंपन्यांना या तारखेपूर्वी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ आणि आदेश दिले आहेत. ज्यात रुग्णालयांमध्ये कॅशलेस दाव्यांना मदत करण्यासाठी समर्पित हेल्प डेस्क देखील समाविष्ट असा अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून Health Insurance Claim मिळवणे सोपे होणार आहे.