दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणूकीच्या पूर्वी एक धक्कादायक विधान केलं आहे. निवडणुकीपूर्वी  ईडी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करू शकते, असं केजरीवाल यांनी सांगितलंय. याबाबत आपल्याला सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचंही ते म्हणालेत. केजरीवाल म्हणाले, ईडीने सत्येंद्र जैन यांच्या घरावर दोनदा छापे टाकले आहेत. पण एकंदाही काही मिळालं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केजरीवाल म्हणाले, मला सूत्रांकडून कळलंय की, पंजाब निवडणुकीच्या काही दिवस आधी ईडी सतेंद्र जैन यांना अटक करणार आहे. केंद्र सरकारने त्याच्यावर यापूर्वी दोनदा छापे टाकले आहेत. पण या छाप्यांमधून त्यांना काहीच मिळालं नाही. 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासारखं रडगाणं गाणार नाही. त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या म्हणून ते घाबरले. माझ्यावर छापा टाकला, माझ्या नातेवाईकांवर छापा टाकला, असं चन्नी म्हणतात.


मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की, तुम्हाला आमच्यावर छापे घालायचे असतील असतील तर करा. माझ्यावर करा, मनीष सिसोदियांवर करा, सत्येंद्र जैन यांच्यावर करा. पण आम्ही काहीही चुकीचे केले नाही म्हणून आम्ही घाबरणार नाही, असंही केजरीवाल यांनी सांगितलंय.