Monkeypox Case in India : परदेशात भारतात परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याची भीती असून या व्यक्तीला रुग्णालयात आयसोलेट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. कोविड-19 महामारीनंतर मंकीपॉक्स व्हायररसने जगाबरोबरच भारतातही चिंताजनक परिस्थिती आहे. पण या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं आरोग्य विभागाने (Health Ministry) म्हटलं आहे. या व्हायरसविरोधात लोकानी जागरुक राहाण्याचं आव्हानही आरोग्य विभागाने केलं आहे. हा व्हायरस वेगाने पसरत असल्याने लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 

 

भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतून आलेल्या या रुग्णात मंकीपॉक्सची लक्षणं (symptoms of monkeypox) आढळल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची ओळख करण्यात आली असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याचं आरोग्यविभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

 

मंकीपॉक्सीची प्रमुख लक्षणं

मंकीपॉक्सची सुरुवाताची लक्षणं अगदी सामान्य असतात. त्यामुळे हा आजार ओळखण्यास उशीर होतो. पण अशी लक्षणं आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

 

ताप

मंकीपॉक्स आजारात सुरुवातीला ताप येतो. हा ताप सामान्य तापापेक्षा दीर्घकाळ राहातो. याशिवाय अंगदुखी आणि थकवा जाणवून लागतो. 

 

त्वचेवर दाने

तापाबरोबरच त्वचेवर दाने येऊ लागतात. सुरुवातीला लहान वाटणारे हे दाने मोठे होतात. हात, पाय आणि चेहऱ्यावर प्रामुख्याने दान पसरु लागतात.

 

सूज

शरीरावर सूज हे मंकीपॉक्सचं सामान्य लक्षण आहे. मान आणि कमरेजवळ सूज येते. 

 

घशात इन्फेक्शन आणि डोकेदुखी

मंकीपॉक्समध्ये घशात इन्फेक्शन होतं, तसंच डोकेदुखी जाणवू लागते. तापाबरोबर ही लक्षणं गंभीर होत जातात. 

 

मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला आयसोलेट करा, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनी मास्कचा वापर करावा, हाथ वारंवार साबणाने धुवावेत असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.