Medicines Prices : सर्वाधिक वापरातील पेनकिलर, अँटिबायोटीकसह 800 औषधं महागणार, यामागचं कारण काय?
Medicines Prices : इथं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि केंद्र शासनाकडून नागरिकांना काही अंशी बऱ्याच क्षेत्रांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Medecines Prices : महागाईचा भस्मासूर सर्वसामान्य जनतेपुढं फार अडचणी निर्माण करणार नाही, यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं मागील काही काळापासून बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पण, तरीही महागाईच्या झळा मात्र अपेक्षित प्रमाणात कमी झालेल्या नाहीत. इथं महागाईचा आलेख सातत्यानं उंचावत असताना तिथं आता यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. किंबहुना याचा सर्वाधिक फटका देशातील नागरिकांना बसणार आहे, कारण ही बाब थेट नागरिकांच्या आरोग्याशीच संबंधित आहे.
1 एप्रिलपासून महत्त्वाच्या आणि सर्रास वापरात असणाऱ्या औषधांचे दर वाढणार आहेत, ज्यामध्ये पेनकिलरपासून अंटिबायोटीक्सपपर्यंतच्या श्रेणीतील औषधांचा समावेश आहे. औषध कंपन्यांना सरकारकडून अॅन्युअल होलसेल प्राईज (WPI) म्हणजेच वार्षिक घाऊक दरवाढीसाठी मान्यता देण्यासाठी सकारात्मक भूमिकेत दिसत असून 1 एप्रिलपासून हे वाढीव दर लागू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. वाढत्या महागाईमुळंच हा निर्णय घेतला जात असल्याचं कारण समोर येत आहे.
Essential Medicines म्हणजे काय?
ज्या Essential Medicines च्या दरात वाढ होणार आहे, ती औषधं मोठ्या संख्येनं नागरिकांच्या वापरात असतात. या औषधांचे विक्री दर आणि दरांबाबतच्या इतर गोष्टी सरकार निर्धारित करत असतं. इथं औषध कंपन्या एका वर्षात 10 टक्के दरवाढ करू शकतात. कॅन्सरविरोधी औषधांचाही या यादीत समावेश आहे.
हेसुद्धा वाचा : Samsung चा जबरदस्त Holi Sale; एक-दोन नव्हे, तर तब्बल 60 टक्के कमी किमतीत करा मनसोक्त खरेदी
प्राथमिक माहितीनुसार एप्रिल महिन्यापासून पेरासिटामोल, अॅनिमिया विरोधी औषधं, अझिथ्रोमायसिन, विटामिन आणि खनिजयुक्त औषधं, मध्यम स्वरुपातील कोविडची (Covid) लागण झालेल्या रुग्णांसाठी वापरली जाणारी औषधं आणि स्टेरॉइडचा समावेश आहे. गेल्या काही काळापासून सातत्यानं या औषधांचा दरवाढीचा प्रश्न उपस्थित केला जात होता. औषधांची वाढती मागणी पाहता हा मुद्दा उचलून धरण्यात आला होता.
दरम्यान शासनाकडून औषधांच्या किमतींमध्ये .0055% दरवाढ देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. मागील वर्षी आणि विशेष म्हणजे 2022 मध्ये या औषधांमध्ये 12 ते 10 टक्के वाढ करण्यात आली होती. परिणामी आता होणारी वाढ किरकोळ स्वरुपातील असेल असं जाणकारांचं मत.