मुंबई  : गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी सुरूवातीला परिस्थिती फार गंभीर होती. गेल्या वर्षभरापासून डॉक्टर्स, नर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या व्हायरसवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या काळात आपण सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ पाहिले ज्यामुळे आपण देखील अस्वस्थ झालो. कोरोना काळात कोरोनावीरांवर प्रचंड ताण होता. हा ताण दूर करण्यासाठी  वीरांनी मार्ग निवडला सोशल मीडिआचा. गेल्या काही महिन्यांपासून चांगले-वाईट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता एका असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्य़ामुळे आपल्याला सर्वांना दिलासा मिळेल, आनंद मिळेल. हा व्हिडिओ आहे जम्मू-काशमीरचा. व्हिडिओमध्ये दोन आरोग्य कर्मचारी पीपीई कीट घालून काला चश्मा या गाण्यावर आपल्याला थिरकताना दिसत आहेत. हे दोन योद्धे डोर-टू-डोर कोव्हीड 19 लसीकरण मोहिमेचा शेवट साजरा करताना आपल्याला दिसत आहेत. 


या  दोन योद्धांचा व्हिडिओ डॉ. जितेंद्र सिंग यांनी ट्विटरवर फेअर केला. व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले, 'जिल्ह्यातील दूरदूरच्या डोंगराळ भागात डोर-टू-डोर लसीकरण संपवून आमचे फ्रंटलाइन हेल्थकेअर कर्मचारी... त्यांचे ताणतणाव दूर झाल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला.' सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.