नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी आज दुपारी २ वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह पाच न्यायमूर्तींचे पीठ सुनावणी घेणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थता समितीला आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने गुरूवारी अहवाल सादर केला. आता अयोध्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थता समिती कितपत यशस्वी झाली हे स्पष्ट होईल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय अयोध्या प्रकरणी मध्यस्थता समितीला वगळून वेगळी सुनावणी करने गरजेचे आहे का हे ठरवेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आठवड्यात किती दिवस सुनावणी होणार? किती जणांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली. 3 मुख्य की सर्व याचिकाकर्त्यांची याचिका विचारात घ्यावी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाने 18 जुलैला मध्यस्थता समितीला हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये सहमती करण्यासाठी 31 जुलैपर्यंत चर्चा करण्यासाठी आदेश दिले होते.


1 ऑगस्टला गुरुवारी सुप्रीम कोर्टाने याबाबतचा अहवाल मागितला आहे. याआधी या मध्यस्थता समितीची दिल्लीतील उत्तर प्रदेश सदनमध्ये बैठक झाली. ज्यामध्ये कोणताच निर्णय न झाल्याचं समोर आलं. अयोध्या वादात एक मत करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न होता.


सुप्रीम कोर्टाने 8 मार्चला 3 सदस्यांची समिती बनवली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एफएमआई खलीफुल्ला हे अध्यक्ष होते. श्रीश्री रविशंकर आणि वरिष्ठ अधिवक्ता श्रीराम पांचू हे या समितीत सदस्य होते.