Cold Wave :  दिल्लीसह उत्तर भारतात शीत लहर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून थंडीची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. येथे 24 तासांत 16 जणांचा हार्टअटॅकमुळे(Heart attack) मृत्यू झाला आहे. हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे(Cold Wave).  थंडीत हार्ट अटॅकमुळे होणा-या मृत्यूंची संख्या वाढल्यानं मोठी खळबळ उडाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंडीमुळे रक्तदाब वाढणं आणि रक्तगुठळी होण्याचं प्रमाण वाढणं, याचा हा परिणाम असल्याचं डॉक्टरांचं म्हणण आहे. तसेच, कोरोनामुळे लोकांच्या प्रकृतीवर आधीच परिणाम झालाय, हेही लक्षात घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात.  धक्कादायक म्हणजे गेल्या 8 दिवसांत 114 जणांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झालाय.  दरम्यान, या आकडेवारीमुळे घाबरून न जाता, काहीही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि थंडीत प्रकृतीची अधिक काळजी घेणंही गरजेचं आहे. 


थंडीमुळे मुंबईकरांचे आरोग्यही धोक्यात


घसरलेला पारा, थंडी तसंच धुकं अशा बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांना घशाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमालीचं वाढल आहे. रूग्णांना घसा खवखवणे, घशात तीव्र वेदना या तक्रारी पहिल्या टप्प्यात जाणवत आहेत. घसा दुखू लागला की कान दुखण्याच्या तक्रारीही आहेत. अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याचं आवाहन करण्यात आले. 


लेह लडाखमध्ये मायनस 30 डिग्री तापमान


लेह लडाखच्या बहुतांश भागात तापमान मायनस 30 अंशाच्या खाली पोहोचलंय...नदी नाले गोठलेत...थंडीमुळे दुकानातल्या तेल आणि पाण्याच्या बाटल्या गोठून गेल्यात..मात्र कडाक्याच्या थंडीतही बाजारपेठा पर्यटकांनी गजबजल्यात... बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक लेह लडाखला पोहोचत आहेत.
काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.त्यामुळे डोंगराळ भागात महामार्ग बंद करावे लागले आहे. तसेच झोजिला पास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे... कुफरीमध्ये गेल्या आठवडाभरापासून बर्फवृष्टी सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पाण्याचे स्त्रोत गोठलेत...मात्र पर्यटक या कडाक्याच्या थंडीचा आनंद घेत आहेत.


मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची मोठी लाट येणार


येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबईसह कोकणातही थंडी वाढणार आहे. जम्मू काश्मीर, लेह, लडाख या ठिकाणी बर्फवृष्टी होतेय. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रातही थंडी वाढणाराय. मुंबई हवामान खात्याच्या कुलाबा वेध शाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळं मुंबईसह जवळपास संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे.