बिहार :  बिहारच्या सीमावर्ती भागात आणि नेपाळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बिहारच्या  किनारी भागातील जनतेला बसला आहे. अतिवृष्टीमूळे बिहार राज्यातील ५१ नागरिक दगावल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत वाढ होत ती २५३ पर्यंत गेली आहे.


बचावकार्य सुरुच


गेल्या काही दिवसांमध्ये पूराचा वेढा पडलेल्या गावांमधून तब्बल ४.६४ लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.


याठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.


२ लष्करी हेलिकॉप्टर्स, एनडीआरएफच्या २० कंपन्या आणि पीएसीच्या (पूरविषयक) २९ कंपन्यांचे जवान यांच्यासह लष्कर जवानांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.  
-या पूरग्रस्तांच्या सोयीसाठी १,२८९ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तब्बल ३.९२ कोटी लोकांनी आसरा घेतला आहे.