पाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय
कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.
बंगळरु : कर्नाटकची राजधानी आज जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.
मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेकांची तारांबळ उडाली आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने २४ तासांत झालेल्या सर्वाधिक पावसाचा मागील दोन दशकतील विक्रम मोडला आहे. यादरम्यान शहरात १८४ सेंटीमीटर पाऊस पडला.
सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे चारपर्यंत सलग पाऊस पडत होता. या महिन्यात जेवढ्या पावसाची अपेक्षा करण्यात आली होती. त्याच्या ८८ टक्के पाऊस अवघ्या ५ तासांत झाला. मंगळवार दरम्यान रात्री मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.
रस्त्यावर पाणी आल्याने मंगळवारी सकाळी अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्याचबरोबर विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आल्याने नागरिक त्रस्त झाले होते. येदीपूर तलाव भरला असून बेलांदपूर मधील तलावाचे पाणी परिसरात घुसले आहे. आयटी कंपन्यांचे हब म्हणून ओळख असलेल्या दक्षिण बंगळुरुमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.