देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे जनजीवन विस्कळीत
देशातील अनेक राज्यांमध्ये पूर
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्य पूर आणि पावसामुळे त्रस्त आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा आणि बिहारमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पावसाने कहर केला आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहेत. गावं पाण्यात बुडाली आहेत. अनेक नद्यांची पाणीपातळी वाढल्यामुळे पूरचे संकट गंभीर बनले आहे. नर्मदा नदी धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. नर्मदा मंदिरासह अनेक मंदिरे पाण्यात बुडाली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हिरण नदीवरील बांध ओसंडून वाहत आहे. त्याचवेळी राजस्थानमधील जालोरला पावसाने झोडपले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. याशिवाय महाराष्ट्रातही अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे.
महाराष्ट्राच्या चंद्रपुरात अनेक गावात पाणी शिरलं आहे. रस्ते जलमय झाले आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. लोकं घरांच्या छतावर बसले आहेत. हजारो लोकं गावात अडकले आहेत. हेलिकॉप्टरने पूरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येत आहे. एनडीआरएफचे पथक आणि नौका देखील मदत व बचाव कार्यात गुंतले आहेत. घरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे.
बिहारमध्ये दोन महिन्यांपासून पूरस्थिती आहे. पूरातून अर्धा बिहार अद्याप सावरलेला नाही. छपराच्या अमानौर ब्लॉकच्या सीमावर्ती गावांमध्ये रस्त्यावर पाणी आहे. घरे पाण्याखाली गेली आहेत. गंडक नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली आहे. परंतु बरौली, सिधवलिया आणि बैकुंठपूर येथे पुराचं पाणी कायम आहे.