ओडिशात हवामान खात्याकडून प्रचंड पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये.
ओडीशा : भारतीय हवामान खात्याने गुरूवारी ओडीशात प्रचंड पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच किनारपट्टीवरही कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे ओडिशाच्या आतील काही जिल्ह्यामध्येही येत्या २४ तासात प्रचंड पाऊस होवू शकतो.तसेच दक्षिण ओडिशामध्ये ४५-५५ प्रति तास वेगाने वारे देखील वाहू शकतात. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.