बंगळूर : कॉन्गिझंटचे फ्रान्सिस्को डिसुझा यांचा वार्षिक पगार सर्वाधिक.


इन्फोसिस चर्चेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच इन्फोसिसचे नव्याने नियुक्ती झालेले सलिल पारेख चर्चेत होते. विशाल सिक्कांनंतर इन्फोसिसचा कारभार कोण हाकणार याविषयीची ती चर्चा होती. पण आता त्यांना इन्फोसिस देत असलेल्या पगाराचीसुद्धा चर्चा रंगली आहे.


आयटीच्या पगाराचं आकर्षण


एकूणच आयटीतल्या कर्मचाऱ्यांचे गलेलठ्ठ पगार हा सर्वसामान्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. त्यात पुन्हा सीईओंचे पगार सर्वसामान्यांना आ.. वासायला लावतात. काही महत्वाच्या आयटी कंपन्यांच्या सीईओंचे पगार बघितल्यावर आपल्या लक्षात हे येतं.


फ्रान्सिस्को डिसुझा सर्वात पुढे


इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेखांचा वार्षिक पगार आहे, ३२.५ कोटी, तर विप्रोचे सीईओ अबिदाली नीमुचवाला यांचा १३.३ कोटी आणि टिसीएसचे राजेश गोपीनाथन यांचा वार्षिक पगार आहे ६.२२ कोटी. पण या सर्वात आघाडीवर आहेत कॉन्गिझंटचे फ्रान्सिस्को डिसुझा यांनी. 
कॉन्गिझंटचे फ्रान्सिस्को डिसुझा यांचा वार्षिक पगार आहे ७६.१ कोटी रुपये.