पठाणकोट: भारतीय सैन्यदलाचं हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. पठाणकोट इथे मंगळवारी भारतीय सैन्यदलाचं ALH हेलिकॉप्टर कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या पायलट आणि को-पायलट बेपत्ता आहेत. यांना शोधण्याचं काम सुरू आहे. 254 आर्मी एव्हिएशनचं हे हेलिकॉप्टर ट्रेनिंग दरम्यान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतर पायलट आणि को पायलटचा शोध सुरू आहे. यापूर्वी या अपघातात दोघेही सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली होती. एनडीआरएफ आणि पोलिसांचे बचावकार्य सुरू आहे. लष्कराच्या एव्हिएशन स्क्वाड्रनचे ध्रुव हेलिकॉप्टरनं सकाळी 10 वाजता उड्डाण केलं. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे.



 स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टर गेल्या 6 महिन्यांत दुसऱ्यांदा क्रॅश झालं आहे. ध्रुव हेलिकॉप्टर भारतातच विकसित करण्यात आलं आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रकल्पांतर्गत हे विकसित करण्यात आलं आहे.




जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यामध्ये रणजीत सागर तलावाजवळ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरचे पार्ट आणि बेपत्ता पायलट यांना शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.