नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री हेमा मालिनी दोघांनाही लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजय संपादन केला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल गुरुदासपूर आणि हेमा मालिनी यांनी मथुरेतून निवडणूक लढवली होती. दोघांनाही मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला. निवडणूक जिंकल्यानंतर दोघेही सभागृहात आपली उपस्थिती दर्शवतील. पण हे दोघे मायलेक शेजारी बसू शकणार नाहीत. यामागचे कारणही तसेच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमा मालिनी या ज्येष्ठ खासदार आहेत तर सनी देओल हा पहिल्यांदाच निवडून येत सभागृहात उपस्थित राहील. त्यामुळे हेमा मालिनी या पुढच्या रांगेत बसतील. तर नवनिर्वाचित खासदार सनी देओल हा मागच्या रांगेतील जागेवर बसेल. सनी देओलने जिंकलेली जागा ही भाजपाची पारंपारिक जागा आहे. या जागेवर दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी देखील निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनानंतर पत्नीला तिकीट दिले जाईल असे वाटत होते. पण भाजपाने या जागेवरून अभिनेता सनी देओलला संधी दिली आहे. 



सनी देओल या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरला होता. त्याने आपल्या संसदीय क्षेत्रातील कानाकोपरा पिंजून काढला आणि मतदारांना भेटला. त्याने आपल्या विभागातील समस्यांची एक यादीच तयार केली आहे. आता लोकांच्या विश्वासावर तो किती खरा ठरतो हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.