मुंबई : भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) फिल्मस्टार्सच्याच राजकीय प्रवेशावर भडकल्याची घटना समोर आली आहे. पत्रकाराला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना हेमा मालिनी (Hema Malini Video) संतापलेल्या पाहायला मिळाला. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर  एकच चर्चा रंगली असून, हेमा मालिनी यांच्यावर टीका होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय?
अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याबद्दलचा प्रश्न हेमा मालिनी (Hema Malini) यांना पत्रकारांनी विचारला होता.या प्रश्नाला उत्तर देताना हेमा मालिनी म्हणाल्या की, तसे असेल तर ही चांगली गोष्ट आहे, असल्याचे त्या सुरूवातीला म्हणतात. पुढे पत्रकारांना त्यांची इच्छा विचारली असता त्यांनी सांगितले की, माझी इच्छा देवाची इच्छा आहे. हे भगवंतावर अवलंबून आहे, भगवान श्रीकृष्ण त्याला हवे ते करतील,असे त्या म्हणाल्या आहेत. 


हेमा मालिनी (Hema Malini) यांचा मथुरा लोकसभा मतदारसंघ आहे.याच मतदारसंघातून कंगना राणौत (Kangana Ranaut) राजकीय पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. यावर हेमा मालिनी म्हणाल्या की, या मतदार संघातून खासदार बनु इच्छिणाऱ्या इतर कोणालाही तुम्ही खासदार बनू देणार नाही. कारण तुम्ही लोकांच्या डोक्यात भरवलंय इथून फक्त एक फिल्मस्टारच खासदार होऊ शकतो. तुम्हाला इथून नेहमीच फिल्मस्टार्सच का हवा असतो? आता उद्या राखी सावंतलाही पाठवाल, असेही संतापत म्हणाल्या आहेत. 



हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या या विधानावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केले आहे.एका य़ुझरने लिहले की, "अरे एक महिला जी स्वत: फिल्मस्टार आहे, तिचा नवरा आणि मुलगाही राजकारणात आहेत, तिला फिल्म स्टार्सच्या राजकारणात येण्याची समस्या का आहे?,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या या विधानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या विधानावरून हेमा मालिनी यांच्यावर टीकाही होत आहे.