गुलाबराव पाटील बरळले, रस्त्याला दिली हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा
राज्य महिला आयोगाकडून कारवाईचा इशारा
मुंबई : महाराष्ट्राचे मंत्री आणि वरिष्ठ शिवसेना नेता गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर सडकून टीका होता आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील जळगाव जिल्ह्याच्या रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालाशी केली आहे.
यावर राज्यातील महिला आयोगाने खडे बोल लावत मंत्र्यांकडून माफीची मागणी केली आहे. राज्यातील महिला आयोगाने केलेल्या मागणीनुसार मंत्र्यांनी या वक्तव्यावर माफी मागावी. (गुलाबराव नरमले, मागितली जाहीर माफी...)
विरोधकांना दिलं चॅलेंज
पाटील यांच्या कथित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या निवडणूक सभेला संबोधित करताना मंत्र्यांनी हे आरोप केले. पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान विरोधकांना आपल्या मतदारसंघात भेट द्या आणि तेथील दर्जेदार रस्ते पहा.
मंत्र्यांची विवादित टिपणी
जळगावचे अनेक वर्षे आमदार असलेले भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल करताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, ३० वर्षे आमदार असलेल्यांनी माझ्या विधानसभा मतदारसंघात येऊन रस्ते बघावेत. जर हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन.
त्याचवेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंत्री पाटील यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
मात्र, राज्य महिला आयोगाने कठोर भूमिका घेतल्यानंतर मंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना खडसावल्यानंतर गुलाबरावांनी माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
पाटील यांनी आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो. हेमा मालिनीच्या गालांशी तुलना बॊलण्याच्या ओघात झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.