इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानवर केलेले सर्व आरोप नाकारले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला आणि आईला भेटी दरम्यान त्रास दिला गेला. त्यांचे मंगळसूत्र, टिकली, बांगड्या आणि पत्नीचे शूज काढण्यास सांगितले. यावर पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे शूज हे सुरक्षा रक्षकांनी जप्त केले आहे कारण त्यांना त्या शूजमध्ये काहीतरी सापडले आहे. 


विदेशी कार्यालयाने एका जबाबात सांगितले आहे की, पाकिस्तान शब्दांची लढाईत विनाकारण अडकू इच्छित नाही. कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईसोबत झालेली भेट. आणि त्या भेटी दरम्यान अधिकाऱ्यांनी चुकीची वागणूक केली. यासंदर्भातील सगळ्या वक्तव्यांचे पाकिस्तान खंडन करत आहे. पाकिस्तानकडून आलेल्या जबाबात त्यांनी असं म्हटलं आहे की, आपला गुन्हा कबूल केलेल्या हेर कमांडर जाधव यांच्या पत्नी आणि आईची भेट ही वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. मुलाखतीनंतर केलेल्या आरोपांचे पाकिस्तान खंडन करत आहे. 


काय आहे पाकिस्तानचं म्हणणं? 


पाकिस्तानने सांगितले की, जर भारताचं म्हणणं खरं होतं तर त्यांनी जाधव कुटुंबिय आणि भारतीय उपयुक्त यांच्या प्रवासा दरम्यान हेच मुद्दे मीडियासमोर का उभे केले नाहीत? ते भारतापासून अगदी सुरक्षित अंतरावर होते. तसेच त्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला अजिबात शाब्दिक लढाईत अडकायचे नाही. आमची पारदर्शकता या मुद्यांचे खंडन करते. कुलूभूषण जाधव यांच्या पत्नींचे शूज परत न देण्याच्या मुद्यावर त्यांनी ''डॉन न्यूज"
ला सांगितले की, सुरक्षेच्या मुद्यानुसार शूज परत देण्यात आले नाहीत.