Stock Pick | शॉर्ट टर्म गुंतवणूकीत दमदार कमाईची संधी; या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी संबधित कंपनीविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. गुंतवणूक करण्याआधी रिस्क कॅल्कुलेशनही महत्वाचे ठरते.
मुंबई : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी संबधित कंपनीविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. गुंतवणूक करण्याआधी रिस्क कॅल्कुलेशनही महत्वाचे ठरते. शेअर बाजार आणि संबधित शेअरची चाल ओळखून गुंतवणूक केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळतो.
मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी एक मजबूत शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जैन यांनी म्हटले की, Hester Bio मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो.
Hester Bio एक क्वॉलिटी कंपनी आहे. स्टॉक आपल्या लेवलवरून 20 टक्क्यांनी खाली आला आहे. सध्या 2515.05 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. ही देशातील एक लिडिंग animal heath कंपनी आहे. याशिवाय ही देशातील दुसरी सर्वात मोठी पॉल्ट्री वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे.
कंपनी 1987 पासून काम करीत आहे. याशिवाय 30 देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय सुरू आहे. जैन यांनी शॉर्ट टर्म साठी या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Hester Bio - Buy
CMP - 2585.45
Target - 3050
Target - 6-9 Month
फंडामेंटल्स
कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 19 टक्के आहे. कंपनीचे मार्जिन्स खूपच चांगले आहेत. कंपनीने 2021 मध्ये जून तिमाहीचे चांगले निकाल जारी केले होते. मागील वर्षी जून तिमाहीतही 6 कोटींचा नफा सादर केला होता. या वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीने 12 कोटींचा नफा सादर केला आहे.