वाराणसी : प्रदूषणाचा त्रास फक्त नागरिकांनाच नाही तर आता मंदिरातील मूर्तींनाही होत आहे. त्यामुळे वाराणसीत भाविकांनी मंदिरातील देवाच्या मूर्तीलाच चक्क मास्क चढवला आहे. काशीमध्ये या प्रदूषणापासून वाचण्यासाठी नागरिकांनी आपल्याप्रमाणेच मूर्तीलाही मास्क घातल्याचे चित्र समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काशीमध्ये गेल्या एक अठवड्यापासून हवेत प्रदूषणाचे प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे तारकेश्वर मंदिरातील देवाच्या मूर्तीला मास्क चढवला आहे. उन्हाळ्यात देवाच्या मूर्तीला चंदन लावले जाते.


तर हिवाळ्यात देवाच्या मुर्तीवर ब्लँकेट महत्वाचे असते. त्याचप्रमाणे वाढत्या प्रदूषणाचा त्रास देवाला सुद्धा होत असल्यामुळे मुर्तीला मास्क चढवण्यात आल्याचे मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगीतले आहे. 


गेल्या काही दिलसांमध्ये वाराणसीमध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सतत वाढत आहे. वायू प्रदूषणाचं स्तर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवारी शहराच्या अनेक भागांमध्ये पाण्याची फवारणी केली आहे.