Best Stock | शॉर्ट टर्म गुंतवणूकीत लाखोंचा परतावा देणारे 2 स्टॉक; एक्सपर्टचा सल्ला
Stock market investment | मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी 2 शेअर्सची निवड केली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी कालावधीच्या गुंतवणूकीत चांगला नफा मिळवू शकता,
मुंबई : कोरोना दरम्यान अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात एन्ट्री घेतली आहे. एवढेच नव्हे तर पैसा लावून चांगली कमाई सुरू केली आहे. नवीन गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगला परतावा मिळवण्यासाठी एक्सपर्टची गरज भासत असते. मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी 2 शेअर्सची निवड केली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी कालावधीच्या गुंतवणूकीत चांगला नफा मिळवू शकता,
विकास सेठी यांची पसंती
मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी खरेदीसाठी Power Mech आणि Sterling And Wilsonचा स्टॉक निवडला आहे. जर तुम्ही शॉर्टटर्ममध्ये कमाई करण्यासाठी चांगल्या शेअरच्या शोधात असाल. तर हे शेअर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.
Power Mech BUY
CMP 1002.90
Target 1030
Stop Loss 960
कंपनीचे सप्टेंबर तिमाही निकाल
मागील वर्षी सप्टेंबरच्या तिमाही निकालात कंपनीने 28 कोटींचा नफा सादर केला होता. 2020 साली कंपनीने 52 कोटींचा नफा सादर केला होता. कंपनीत प्रमोटर्सची भागिदारी 64 टक्के इतकी आहे.
---
Sterling and Wilson मध्ये गुंतवणूक
सेठी यांनी दुसरा शेअर एनर्जी क्षेत्रातील दिला आहे. ही कंपनी 34 देशांमध्ये आपला व्यवसाय करते. नुकतेच कंपनीमध्ये रिलायंसने 15-16 टक्क्यांची भागिदारी विकत घेतली आहे. कंपनी सोलर एनर्जी सेक्टरमध्ये काम करते..
Sterling and Wilson - Buy
CMP - 406s
Target - 430
Stop Loss - 390