मुंबई: High Return Stock शेअर मार्केट सध्या रेकॉर्ड हायवर आहे. विविध क्षेत्रातील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. यासह या कंपनींच्या शेअर्सनी मल्टीबॅगर असल्याचं सिद्ध केलंय. यामध्ये मागणी असेल्याने केमिकल स्टॉक्सने तर गुंतवणूकदारांना धमाकेदार फायदा मिळवून दिला आहे. केमिकल सेक्टरमधील Yasho Industries ही कंपनी या क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉक आहेत. जे शेअर त्यांच्या मूळ किमंतीपेक्षा अनेक पटीने दुप्पट तिप्पट फायदा मिळवून देतात, अशा शेअर्सना मल्टीबॅगर स्टॉक म्हंटलं जातं. (High Return Stocks multibagger stocks Yasho Industries shares made 5 lakhs in one year to 24  lakhs 61 thousand rupees)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Yasho Industries मुळे गुंतवणूकदारांची चांदी


Yasho Industries च्या शेअरमुळे गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई झाली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षात तब्बल 392 टक्के फायदा मिळवून दिला आहे. या एका शेअरची किंमत 10 सप्टेंबर 2020 रोजी 161 रुपये इतकी होती. त्या एका शेअरची किंमत आता 645 रुपये (गुरुवारची क्लोजिंग किंमत) इतकी आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना 6 महिन्यात 162 टक्क्यांनी फायदा मिळवून दिलाय. 


5 लाखांचे 24 लाख 61 हजार  


या शेअर्समध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. समजा वर्षभराआधी तुम्ही Yasho Industries च्या शेअरमध्ये गुंतवणूक केली. तर आज या शेअरच्या किंमतीवर त्याची वॅल्यू ही 4 लाख 92 हजार इतकी असती. एकूणच काय तर पाचपट लाभ झाला असता. थोडक्यात सांगायचं तर 5 लाख गुंतवले असते, तर त्याची आज किमंत ही 24 लाख 61 हजार रुपये इतकी असती.  


जाणून घ्या Yasho Industries बाबत 


Yasho Industries मध्ये विविध प्रकारच्या केमिकल्सची निर्मिती केली जाते. या रसायनांचा प्रामुख्याने 5 प्रमुख उद्योग श्रेणींमध्ये वापर केला जातो. यामध्ये स्पेशॅलिटी केमिकल्स, अरोमा केमिकल्स, फूड अँटीऑक्सिडंट्स, रबर एक्सेलेरेटर्स आणि स्नेहक अ‍ॅडिटिव्ह इंडस्ट्रीजचा समावेश आहे. याचं उत्पादन हे गुजरातमध्ये केलं जातं. याचं मॅन्यूफॅक्चरिंग यूनिटची क्षमता ही 9 हजार 3200 MTPA इतकी आहे. 


टीप : कोणत्याही गुंतवणूकीआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.