नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढचे 48 तास अतिप्रदूषणानं निर्माण झालेल्या धुक्याचा धोका कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळांची सु्ट्टी रविवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळच्या वेळात घराच्या बाहेर न पडण्याच्या इशारा सरकारनं नागरिकांना दिला आहे. लहान मुलं आणि श्वसनविकार असणाऱ्यांनी घराबाहेर पडणे अत्यंत धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. प्रदूषणाचा स्तर खाली यावा म्हणून दिल्लीत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता इतर कुठल्याही मालवाहक वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.


दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील बांधाकामांचे सर्व प्रकल्प अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत. रस्त्यावर वाहनांची संख्या कमी व्हावी यासाठी दिल्ली मेट्रोरेल कॉर्पोरेशननं गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. प्रदूषणाचा स्तर जोपर्यंत 200 PPM च्या खाली आहे तोवर धोका कायम असल्याचं इंडियन मेडिकल असोशिएशननं म्हटलं आहे.