Himachal Accident:  हिमाचलच्या कुल्लूमध्ये एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात 10 जण जखमी झाले. औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 वर घियागीजवळ हा अपघात झाला. जिथे पर्यटकांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला (Tempo Traveler accident) अपघात झाला. (himachal pradesh accident tourist vehicle rolled down from a cliff)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारमध्ये बसलेल्या पर्यटकांपैकी 7 जण ठार तर 10 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्यात आहेत.  या बसमध्ये (Bus Accident) एकूण 16 लोक होते. यामध्ये 3 विद्यार्थी आयआयटी वाराणसीचे असल्याची माहिती समोर आली आहे. 


हा अपघात रविवारी (25 सप्टेंबर) रात्री 8.30 च्या सुमारास कुल्लूमधील (Kullu, Himachal) बंजार व्हॅलीच्या घियागी भागात NH-305 वर झाला. टेम्पो ट्रॅव्हलर खड्ड्यात पडल्याने येथे गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक बचावासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र खराब हवामान आणि अंधारामुळे बचावकार्यात मोठी अडचण आली. या बचावकार्याला सुमारे दोन तास लागले.  


अपघातात जखमी झालेल्या 10 लोकांपैकी 5 जणांना कुल्लूच्या झोनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून 5 जणांवर बंजार येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री 11.35 वाजता मदत आणि बचाव कार्य संपले. मृतांमध्ये 5 तरुण आणि 2 मुलींचा समावेश आहे. प्रवाशांमध्ये तीन आयआयटी वाराणसीचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.


वाचा : Work from home: घरून काम करून पैसे कमवायचे आहेत? मग ही बातमी वाचाच! 


रात्री साडेआठच्या सुमारास 


रस्त्यापासून सुमारे 400 मीटर खाली दरीत पडलेल्या वाहनातून जखमींना वाचवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बंजारचे आमदार सुरेंद्र शौरीही घटनास्थळी पोहोचले. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जखमींना मदत करण्यासाठी त्यांनी लोकांकडून मदत मागितली. जखमींना बंजार रुग्णालयात आणण्यासाठी प्रशासनाकडून रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या होत्या. जखमींना तातडीने बंजार रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर जखमींवर बंजार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.