Work from home: घरून काम करून पैसे कमवायचे आहेत? मग ही बातमी वाचाच!

Flipkart Job : रोजच्या धावपळीच्या जीवनापासून (busy , hectic lifestyle) थोडं दूर होऊन घरी बसून काम करणं कोणाला आवडणार नाही ? जर घर बसल्या तुम्हाला काम करायचे असेल तर एक ई कॉमर्स कंपनीने तुमच्यासाठी मोठी भरती काढली. त्यामुळे तुम्हाला Work from Home करणे शक्य जाईल. 

Updated: Sep 26, 2022, 09:36 AM IST
Work from home: घरून काम करून पैसे कमवायचे आहेत? मग ही बातमी वाचाच!  title=

Flipkart jobs work from home :  रिक्त पदे भरण्यासाठी देशातील टॉप ई- कॉमर्स कंपनी Flipkart भरती मोहीम राबवणार आहे. देशातील टॉप ई- कॉमर्स कंपनी Flipkart लवकरच फ्रेशर्स आणि प्रोफेशनल उमेदवारांसाठी मोठी भरती करणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. (flipkart jobs work from home big opportunity freshers and professionals)

E-Retailer कंपनीने रिक्त पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या जॉब (job update) अलर्टचा फायदा असा आहे की पात्र उमेदवारांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. Flipkart ने अनुभवी उमेदवारांकडून तसेच फ्रेशर्सकडून (Freshers Jobs) अर्ज मागवले आहेत.

Flipkart ने दिल्ली, कर्नाटक, बिहार आणि इतर प्रदेशांमध्ये WFH मॉडेलसह विविध भूमिकांसाठी भरती करत आहे. ई-रिटेलर (E-Retailer) कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल. भरती प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने केली जाईल म्हणजेच मुलाखती ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येतील.

याबाबत  Flipkart ने सांगितले की त्यांची कंपनी नेहमीच योग्य लोकांच्या शोधात असते आणि पात्र लोकांची दखल घेतली जाते. ग्राहक हे त्यांचे पहिले प्राधान्य असून त्यांची उत्पादने आणि सेवा या तत्त्वावर आधारित असतील. लोकांच्या कलागुणांना कामाच्या ठिकाणी आणखी वाढवता येते आणि मजबूत नेतृत्वगुण असलेले लोक संस्थेत प्रगती करू शकतात, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

वाचा :  Petrol Diesel भरण्याआधी जाणून घ्या आजचे दर  

कंपनीच्या धोरणानुसार, प्रतिनिधींना अधिक चांगली संधी दिली जाईल जेणेकरून ते कामात नावीन्य आणू शकतील. निवेदनात म्हटले आहे की कंपनीच्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारे काम करावे लागेल की कंपनी स्पर्धात्मक आणि बाजारातील परिस्थितीशी सुसंगत राहू  शकेल. त्यामुळे flipkart मध्ये नोकरीची सुवर्णसंधी फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना असणार आहे. 

 

 

flipkart jobs work from home big opportunity freshers and professionals