नवी दिल्ली :  गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश निवडणुकीचाही उद्या निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी उद्या मतमोजणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशमध्ये यंदा सरासरी ७५ टक्के मतदान झालंय त्यामुळे वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे. 


मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सारी यंत्रणाही सज्ज झाली आहे. 


या निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्री विरभद्र सिंग आणि माजी मुख्यमंत्री प्रेमकमुरा धुमल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


हिमाचलमध्ये मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताबदल हा हिमाचल प्रदेशचा आतापर्यंतचा इतिहास आहे. 


आता यंदाच्या निवडणुकीत ही परंपरा कायम राखत, यावेळी काँग्रेसकडून भाजप सत्ता हिसकावणार का याबाबत, राजकीय जाणकारांमध्ये उत्सुकता आहे.



काँग्रेस सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार?