सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालीय. विधानसभेच्या सर्व 68 जागांसाठी उद्या एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी 337 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचल प्रदेशमधले 50 लाखापेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरूवात होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. तसंच व्हीव्हीपीएटी यंत्रणेचा वापर करणारं हिमाचल पहिलं राज्य ठरणार आहे. हिमाचल प्रदेशची मतमोजणी गुजरातसोबतच 18 डिसेंबरला होणार आहे. 


काँग्रेस आणि भाजपमध्येच मुख्य लढत रंगणार आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंहांसह 10 मंत्र्यांची आणि डझनभर माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या तीस वर्षांपासून सत्तांतराची परंपरा आहे. त्यामुळं जनता यंदा भाजपला कौल देणार की काँग्रेसकडेच पुन्हा सत्ता सोपवणार याकडे लक्ष लागले आहे.