हिमाचल प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सत्तेचा झेंडा रोवल्यापासून भाजपच्या विजयाचा वारू चौखुर उधळलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हा वारू हिमाचल प्रदेशमध्येही अशीच घोडदौड करणार का हा प्रश्न आहे.  हिमाचलमधील विधानसभा निवडणुकीसाठी आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा, रॅलीमधून सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय.


हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवणार का याबाबत उत्सुकता आहे. कारण 1990 पासून सत्तांतराची परंपरा हिमाचलच्या जनतेनं कायम ठेवलीय. त्यामुळे परंपरेनुसार हिमाचलची जनता भाजपकडे सत्ता सोपवणार की काँग्रेसलाच पसंती देणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.


काँग्रेसनं मुख्यमंत्री असलेल्या राजपूत समाजाचे वीरभद्र सिंह यांनाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपलाही मुख्यमंत्रीपदासाठी राजपूत समाजाचे प्रेमकुमार धुमल यांचा चेहरा पुढं करणं भाग पडलंय.