Himachal Roadways Video : अनेकदा आपण प्रवासाला निघतो तेव्हा काही मंडळी थेट बसनं प्रवास करण्याला प्राधान्य देतात. त्यामागं कारणंही तसंच असतं. बरेच असे प्रवासवेडे आहेत ज्यांना बसनं प्रवास करण्यात मजा वाटते. पण, काहींसाठी मात्र हा बसप्रवास त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो. काहींसाठी पोटाची खळगी भरण्याचं साधन, तर काहींसाठी एक नवा अनुभव. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक बस प्रवासही इतके अनुभव देऊन जात असेल, यावर तुमचा विश्वास नसेल तर सोशल मीडियावर होणारा एक व्हिडीओ तुम्ही पाहाच. 


भारतातील विविध भौगोलिक रचनांतून साकारलेल्या निसर्गाशी मैत्री करत सुरु असणारा एक श्वास रोखणारा प्रवास या व्हिडीओमध्ये पाहता येत आहे. 


व्हायरल होणारा हा व्हिडीओ हिमाचल प्रदेश रोडवेजचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये डोंगर फोडून तयार करण्यात आलेल्या वाटेवरून, धबधबा ओलांडत जाणारी एक बस पाहताना बसचालकाची प्रशंसा करु तितकी कमी, अशीच उत्फूर्त दाद सर्वजण देत आहेत. 


बस चालकाचं कसबंही इतकं की, नजर जराही हटली तरीही मोठा अपघात... थोडक्यात काय तर नजर हटी और दुर्घटना घटी. 



पण, हिमाचलमध्ये ट्रक चालक असो किंवा मग हे बस चालक. या डोंगराळ वाटा जणू आपले खास मित्रच आहेत या भावनेनं त्या वाटेनं पुढे जातात आणि सर्वांनाच थक्क करतात. 


हिमाचल प्रदेशात कधी प्रवास करण्याचा योग आल्यास असा एखादा चित्तथरारक प्रवास नक्की करून पाहा. कारण, तेव्हाच या मंडळींच्या श्रमाची जाणीव तुम्हाला असेल.