अंधांसाठी डिजिटल लायब्ररी, डॉ. सुभाष चंद्रा विद्यार्थ्यांच्या भेटीला
डॉ. सुभाष चंद्रा यांनी रेडक्रॉस भवनात उपस्थित दिव्यंग आणि अंध मुलांना मिठाईचं वाटप करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
हिसार : हिसारच्या रेडक्रॉ़स भवनमध्ये नेत्रहीन मुलंही कम्प्युटरद्वारे शिक्षणाचा लाभ घेत आहेत. 'सुभाष चंद्रा फाउंडेशन'च्या मदतीनं हरियाणामध्ये अंध मुलांसाठी पहिली डिजिटल लायब्ररी सुरु करण्यात आलीय. या लायब्ररीच्या पाहणीसाठी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा हिसारमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत डीसी अशोक मीणा, अग्रोहा विकास ट्रस्टचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष बजरंग दास गर्ग, रेडक्रॉसचे सचिव रविंद्र लोहान हेदेखील उपस्थित होते.
लायब्ररी सुरु करण्यासाठी आलेला खर्च 'सुभाष चंद्रा फाउंडेशन'द्वारे करण्यात आला. यामध्ये फाऊंडेशनद्वारे शिक्षकही आपलं योगदान देत आहेत.
डॉ. सुभाष चंद्रा यांनी रेडक्रॉस भवनात उपस्थित दिव्यंग आणि अंध मुलांना मिठाईचं वाटप करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
निसर्ग प्रत्येक व्यक्तीला काही ना काही देणगी जरूर देत असतो. अंध व्यक्तींजवळ पाहण्याची क्षमता नसेल परंतु, त्यांची इच्छाशक्ती मात्र इतर व्यक्तींपेक्षा अधिक तीव्र असते, असं म्हणत यावेळी सुभाष चंद्रा यांनी या मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.