नवी दिल्ली : संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितलं, ३ ऑगस्टचा दिवस हा संसदीय इतिहासासाठी अनोखा दिवस होता, कारण या दिवशी लोकसभेचं कामकाज १०० टक्के पार पडलं. मात्र शून्य प्रहर न घेण्यावर काँग्रेस खासदारांनी संसदेची परंपरा मोडीत काढू नका अशी आठवणही करून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत कुमार यावर बोलताना म्हणाले, ३ ऑगस्ट या दिवशी सदनाच्या कार्यसूचीत ३ विधेयक मांडण्यात आले होते, आणि तीनही विधेयकांवर चर्चा करण्यात आल्यानंतर ते पारीत करण्यात आले.


अनंत कुमार यांनी काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर देताना सांगितलं, भारतीय पेट्रोलियम आणि उर्जा संस्थान विधेयक  २०१७ हे महत्वाचे विधेयक आहे. हे विधेयक पारीत करावे असे आवाहन त्यांनी काँग्रेस खासदारांना केले, तसेच हे विधेयक पारीत करण्यासाठी शून्यप्रहर घेता येऊ शकतो, यापूर्वी खासदार खरगे यांनी शून्यप्रहराची परंपरा कायम ठेवण्याची मागणी केली होती.


यापूर्वी खरगे यांनी म्हटलं होतं, सदनात ३ ऑगस्ट रोजी शून्यप्रहर झाला नाही. हे योग्य नसल्याचं खासदार खरगे यांनी सांगितलं, त्यांनी आरोप लावला की, सरकार संसदेची परंपरा संपवायला निघालं आहे. अनंत कुमार यांनी म्हटलं होतं की, आज शून्यप्रहर घेऊ नका, मात्र लोकसभा अध्यक्षांनी विधेयकानंतर शून्यप्रहराच्या मुद्यांना घेतलं जाईल असं सांगितलं.