कर्नाटक : अनेक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये चोर मौजमजेसाठी, गर्लफ्रेंडसाठी अथवा इतर अनेक कारणांसाठी चोरी करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र या घटनेत चोरांचा चोरी मागचा उद्देश पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकलीय. सोनसाखळीची चोरी करताना या चैन स्नॅचरच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे चोर चोरीच्या पैशातून सेक्स वर्कर्सशी शारीरिक संबंध ठेवायचे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण चोरांची टोळी  एचआयव्ही बाधित होती. त्यामुळे आता या चोरांमुळे शहरात एचआयव्हीचा संक्रमण वाढण्याची भीती आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातून जयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचरच्या टोळीने 26 मे रोजी नित्या नावाच्या महिलेची सोनसाखळी हिसकावली होती.  या घटनेत तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही, मोबाईल फोन कॉल्सचा मागोवा घेत मगडीजवळ चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी तपासादरम्यान 2,000 हून अधिक कॉल्सचा तपास केला आणि आरोपी चेन स्नॅचरचा माग काढण्यासाठी बरेच तास काम केले. आणि अखेर ते ताब्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून 140 ग्रॅमच्या सहा सोनसाखळ्या आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. 


पोलिसांनी चैन स्नॅचिंगच्या आरोपाखाली तीन एचआयव्ही बाधित चैन स्नॅचरच्या टोळीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वय 20 ते 30 वर्षे दरम्यान आहे. या आरोपींना चोरी करण्यामागचं कारण विचारले असता, त्यांनी जे उत्तर दिलं ते पाहून पोलिस चक्रावले आहे.  एचआयव्ही बाधित चैन स्नॅचर सर्वसामान्यांच्या सोनसाखळ्या चोरून त्यांना विकून मिळालेल्या पैशातून सेक्स वर्कर्सशी शारीरिक संबंध ठेवायचे.


सेक्स वर्करचा शोध सुरू 
एचआयव्ही बाधित आरोपी चोरीच्या पैशातून सेक्स वर्कर्ससोबत शारीरीक संबंध ठेवायचे.आरोपींनी एचआयव्हीची लागण असूनही, सेक्स वर्कर्सना न सांगता तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे. या आरोपींनी आतापर्यंत एचआयव्ही पॉझिटिव्ह असूनही 90 हून अधिक सेक्स वर्कर्ससोबत सेक्स केले होते. आता पोलिसांनी त्या सेक्स वर्करचा शोध सुरू केला आहे. 


कारागृहात बनवली टोळी
एचआयव्ही बाधित आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.  सोनसाखळी घालून एकट्या बाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करायचे आणि निर्जन ठिकाणी जाऊन चोरी करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वी हे तरुण बेंगळुरूच्या पारप्पाना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात भेटले होते, जिथे त्यांना टोळी तयार करण्याची कल्पना सुचली. आणि ही टोळी दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग करायची आणि दागिने विकून देहविक्रीसाठी पैसे खर्च करायचे.