How To Make Organic Colors at Home: अवघ्या दोन दिवसांवर होळीचा सण (Holi Celebrations) आला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या घरी होळीची तयारी सुरू झाली असेलच. कुणी यावेळी होळीला कसे पदार्थ बनावेत यावर तयारी करते असेल तर कोणी होळीच्या रंगांची, पिचकारी आणि होळी खेळण्याच्या वस्तूंची (How to make Hoil Colors at Home) तयारी करत असेल. होळीच्या सणाला महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे रंगांचा. सध्या शहरांमध्ये प्रदुषण (Pollution) वाढू लागले आहे. त्यामुळे आपल्यालाही होळी खेळताना चांगल्या रंगांचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यातून सध्या रंगांमध्येही विविध गोष्टींचे रासायनिक मिश्रणही (Holi Colours with Chemicals) केलेले असते. अशावेळी आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तेव्हा यावर उपाय म्हणजे आपण रंग हे घरच्या घरी तयार करू शकता. तेव्हा येत्या वर्षाच्या होळीला तुम्ही कशाप्रकारे रंग तयार करू शकता यावर एक नजर टाकूयात. (Holi 2023 Organic Colors make holi colours at home using organic and eco friendly techniques)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पर्यावरणस्नेही गोष्टींकडे (Eco-Friendly Colours) आपल्या सगळ्यांचाच कल वाढतो आहे. त्यातून केमिकल मिक्स रंग (Chemical Mix Colours) असतील तर आपल्याला त्याप्रमाणे आपल्या शरीराच्या आणि त्वेचेच्या काळजीच्या दृष्टीनं लक्ष देणेही बंधनकारक आहे. तेव्हा अशावेळी आपण घरच्या घरीच ऑरगॅनिक रंग (Organic Colours) तयार करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या घरी काही गोष्टींचा वापर करणं आवश्यक असते. तुमच्या घरी जर का या कोणत्याही गोष्टी नसतील तर काळजी करू नका. तुमच्या जवळच्या बाजारातही त्या हमखास उपलब्ध होतील. 


घरगुती होळी अशी करा साजरी 


पुर्वी होळीचा सण जवळ आला की आपण सगळेच आठवभर आधी तरी शॉपिंगला सुरूवात करायचो. पहिल्यासारखे आत्ताही आठवडाभर आधी रंग विकत घेतले जात आहेत. होळीच्या निमित्ताने बाजारातही लवकरच दुकानदार आपले ठाण मांडून बसतात. खरंतर होळीचे रंग विकत घेताना अनेक तऱ्हेची काळजी ही घ्यावीच लागते. आता लोकं बाहेर होळीचे रंग (Holi Shopping) खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी रंग बनवण्यावर प्राधान्य देत आहेत. 


हेही वाचा - International Women's Day 2023: स्त्री धन काय असतं? कायद्यानुसार त्याचं महत्त्व काय, प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाची माहिती


घरच्या घरी कसे बनवाल रंग? 


आपल्या जर प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक रंग (Natural Colours Making) बनवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला फक्त काही फूलांची मदत लागेल. तुम्ही बाजारातून अनेक फूलं विकत घेऊ शकता. तुम्ही ही फूल घेतल्यानंतर सर्वप्रथम काय कराल तर या फुलांपासून रंग बनविण्याच्या दृष्टीनं तुम्हालाही ही फूल आधी उन्हात सुखत ठेवावी लागतील. मिस्करमधून किंवा पाट्या-वरवंट्यावरून त्याची बारिक पावडर करून घ्या. यामध्ये तुम्हाला अजून नैसर्गिक इसेन्स हवा असेल तर तुम्ही चंदनाचे तेलही टाकू शकता. जर तुम्हाला सुके रंग हवे असतील तर तुम्ही चंदनाचे तेल न टाकता फुलांचे पावडर तयार करू शकता. जर तुम्ही मऊ आणि मुलायम रंग हवे असतील तर ही फूल रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.