Holi 2024: देशभरात मोठ्या प्रमाणात होळी साजरी करण्यात येते. रविवारी होलिकाचे दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन/धुळवड साजरी केली जाते. रंगाची उधळण करत कुटुंबासोबत व मित्रांसोबत धुळवड साजरी केली जाते. देशभरात मोठ्या उत्साहात आज धुळवड साजरी केली जात आहे. मुंबईपासून ते वृंदावनपर्यंत होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. कुठे फक्त रंगाची होळी खेळण्यात येतंय तर कुठे पाण्यासोबत होळी खेळण्यात येते. देशभरात होळी कशी साजरी केला जातेय. यावर एक नजर टाकूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जल्लोष


मुंबईत होळीच्या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक सोसायट्यांकडून होळीसाठी विषेश कार्यक्रमांची तयारी केल्याचे पाहायला मिळतेय. तर जुहू समुद्रकिनाऱ्यावर तरुणाई होळी खेळण्यासाठी आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांना रंग लावत होळी खेळण्यात येत आहे. 



पुण्यातही उत्साह


पुण्यातही होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. लहान मुलं एकमेकांवर रंग उडवत होळी साजरी करत आहेत. 



वृंदावन गर्दीने फुलले


उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथे मोठ्या प्रमाणात होळी साजरी केली जाते. राधा वल्लभ मंदिकात मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहतात. तर, वृंदावनच्या गल्ली बोळातही होळीचा जल्लोष पाहायला मिळतो. वृंदावनचे रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. भाविक रंगाची उधळण करत होळीचा आनंद साजरा करत आहेत. 



चेन्नईत उत्साह


चेन्नईतील सॉकार्पेट येथे लोक मोठ्या उत्साहात होळीचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. रंगांची उधळण व डिजेच्या तालावर तरुण होळी साजरी करताना दिसत आहेत. 



राजस्थानात पारंपारिक होळी


राजस्थानातही होळीचा जल्लोष पाहायला मिळतोय. राजस्थानात धुलांडी महोत्सव साजरा करण्यात येतो. जयपुर येथे पर्यटन विभागाकडून होळीच्या दिवशी या महोत्वसाचे आयोजन करण्यात येते. पारंपारिक गाणी आणि रंगांची उधळण असा माहोल यावेळी राजस्थानात पाहायला मिळतोय. पारंपारिक वेषात व संगीतावर ठेका धरत होळी साजरी केली जाते आहे. 



भारतीय जवानांनी साजरी केली होळी 


पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यात बीएसएफ जवानांनीही होळीचा आनंद साजरा केला. खासा हेडकॉर्टर येथे जवान डिजेच्या तालावर डान्स करताना दिसत आहे. 



आसाममध्ये फुलांची होळी


आसाममध्ये डिब्रुगढ येथे भाविकांनी फुलांची होळी साजरी केली. प्रभात फेरीदरम्यान फुलांची होळी साजरी केली. नैसर्गिक पद्धतीने होळी खेळण्याची ही पद्धत ६ वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. 



उत्तर प्रदेश


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी होळीच्या निमित्ताने गोरखनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला.