नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे घर असावे असे वाटते. परंतु स्वतःच्या घराचे स्वप्न एवढ्या सहजपणे साकार होत नाही. त्यासाठी मोठे कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते. परंतु ही मेहनत आणि कष्टाचा पैसा घर घेताना आवश्यक ती काळजी नाही घेतली तर वाया जाऊ शकतो.  घर खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवली जाते. त्यानंतर काही अडचणी आल्यास पुन्हा घर विकने दुसरीकडे घेणे व्यवहार्य ठरत नाही म्हणून वाचा ५ महत्वाच्या टीप्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ आताच घर खरेदी करावे की काही वर्ष थांबावे?


घर खरेदी करताना आपल्याला सर्वात आधी स्वतःला हा प्रश्न विचारावा लागेल की, आपल्याला आताच घर घ्यायचंय की काही वर्ष थांबलेलं चालणार आहे. जर तुम्हाला वाटतंय की, सध्या तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही. तसेच येत्या दिवसांमध्ये तुमचा खर्च वाढणार आहे. किंवा कोणत्याही दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावं लागू शकतं. अशा परिस्थितीत तुम्ही घर घेणं टाळायला हवं.


२ जे घर घेणार असाल त्याची संपूर्ण माहिती घ्या


जर घर खरेदीचं मन बनवलंच असेल तर, सर्वात आधी त्या घराची संपूर्ण माहिती घ्या.  घराचे लोकेशन,  तुमचं ऑफिस, मुलांची शाळा, रुग्णालये, बाजारपेठ इत्यादी गोष्टी किती जवळ किंवा लांब आहेत. ते बघा. घराशी संबधित कोणतेही सरकारी प्रकरण नाही ना याची खात्री करा. बिल्डरपासून घर घेत असाल तर, चेक करा की त्याने तुमच्यापासून कोणती माहिती लपवली तर नाही ना.
घराचे क्षेत्रफळ, पाण्याची सुविधा, पार्किंग, एअर क्वॉलिटी या सर्वांची माहिती घ्या


३ रेडी टू मुव्ह घर घ्यावे की, प्रोजेक्टमध्ये पैसा लाववा


बहुतांश वेळा रेडी टू मुव्ह घर महाग पडते. तसेच एखाद्या विकसनशिल प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवल्यास तुमचे अनेक लाख वाचू शकतात. जर तुम्हाला सध्या राहण्याची अडचण नाही तसेच घरभाडेदेखील अधिक नाही. अशा परिस्थितीत डेव्हलपिंग प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणे  फायद्याचे ठरते. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ठरलेल्या वेळेत तुम्हाला घराचे पजेशन मिळाले नाही तर, तुम्हाला त्याची भरपाई मिळणार का?  या गोष्टीची व्यवस्थित खातरजमा करा


४ किती आणि किती वर्षांचे गृह कर्ज घ्यावे?


घराची किंमत आणि घर घेण्याच्या आधी हे ठरवा की, तुम्हाला गृह कर्जाची गरज आहे किंवा नाही. जर गरज पडत असेल तर किती आणि तुमच्याकडे जमा रक्कम किती? सोबतच हे देखील गणित करा की, तुम्हाला गृह कर्ज  किती वर्षापर्यंत घ्यायचे आहे. जेवढे कमी वर्ष तुम्ही गृह कर्ज घेता तेवढा तुम्हाला हफ्ता अधिक द्यावा लागेल. या केसमध्ये तुम्हाला व्याज कमी द्यावे लागेल. तुमच्या पगाराच्या दृष्टीने बघावे लागेल की, घर खर्चांवर EMIचा परिणाम होणार नाही.


५. उत्पन्नाची साधणं काय?
 
 जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतले तर, तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम ईएमआयच्या स्वरूपात भरावी लागते. कोणत्याही कारणामुळे तुम्ही हफ्ता भरू शकला नाही. तर लेट फी तसेच पेंडिंग ईएमआयवर व्याज देखील लागते. त्यामुळे घर खरेदी करताना तुमचे इनकम  सोर्सेस किती कोणकोणते आहेत. याची खात्री करा. त्यामुळे दर महिन्याला काही पैसे एमरजन्सी फंडमद्ये जमा करा. जेणे करून अडचणीच्या वेळी हफ्ता भरण्यास अडचण येणार नाही.