नवी दिल्ली : एकदोन दिवस किंवा फारफारतर एक महिना घरापासून दूर राहिल्यानंतर जास्तीचा एक दिवसही एका तपासारखा वाटू लागतो. पण, कर्नाटकचे 34 वर्षी एअर कंडिशनिंग टेक्निशियन हरीश बांगेरा तब्बल 600 दिवस परराष्ट्राच्या ताब्यात राहून भारतात परतले आहेत. सौदी अरेबियामध्ये ते तब्बल 600 दिवस कैदेत होते. त्यांनी न केलल्या चिथावणीखोर फेसबुक पोस्टसाठी ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवर मक्का विषयी चिथावणीखोर पोस्ट केल्याबद्दल आणि सौदी अरेबियाच्या राजाविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याबद्दल त्यांना 22 डिसेंबर 2019 ला अटक करण्यात आली होती. 


कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेत मिळवलेल्या माहितीनुसार बांगेरा यांच्या नावानं फेक अकाऊंट खोलत उडीपी जिल्ह्यातील दोन व्यक्तींनी या आक्षेपार्ह पोस्ट केल्याची धक्कादायक माहिती समोर आणली. ऑक्टोबर 2020 मध्ये कर्नाटक पोलिसांनी Abdul Huyez आणि Abdul Thuyez या दोन व्यक्तींना (मुख्य आरोपींना) ताब्यात घेतलं. ज्यानंतर बांगेरा यांच्या कुटुंबानं कर्नाटक पोलिसांच्या तपासाचा हा अहवाल सौदी अरेबियातील संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवला आणि त्यांना तेथील कैदेतून बाहेर काढण्याचा हा संघर्ष अखेर यशस्वी ठरला. 


अफगाणिस्तानात सुरु झालंय 'तालिबान राज'; महिला अँकरनं सांगितला 'तो' प्रसंग 


मायदेशी येता हरीश यांची पहिली प्रतिक्रिया.... 


Kempegowda International Airportवर बांगेरा यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीनं त्यांचं स्वागत केलं. भारतात येताच हरीश यांनी सर्वप्रथम कर्नाटक पोलिसांचे आभार मानले. आपल्याला कैदेतून सोडवण्यासाठी कुटुंबाला मदत करणाऱ्या प्रत्येकाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कागदपत्रांची पूर्तता फार आधीच झाली होती, पण कोरोनाच्या कारणास्तव सौदी अरेबियातील न्यायालयांचं कामकाज बंद होतं, अथवा आपली सुटका याआधी झाली असती असंही ते म्हणाले.